नवरात्री निमित्ताने डॉ. संजीव करंडे यांच्या तर्फे विविध आरोग्य उपक्रम

दिनेश पवार, दौड

नवरात्री निमित्त महालक्ष्मी हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर दौंड तर्फे दिनांक 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 या कालवधित 9 दिवस मोफत डिलिव्हरी(नॉर्मल व सिझेरियन),मोफत सोनोग्राफी, स्त्रियांकरिता मोफत ओ.पी.डी इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात आले आहे .

तसेच याकाळात हिमोग्लोबिन तपासणी शिबिर, हाडांची घनता तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, वंध्यत्व तपासणी शिबिर, मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबीर,गर्भ संस्कार,स्त्री रोग तपासणी शिबीर, हिपॅटायटीस-बी लसीकरण ,कोविड19 लसीकरण इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहे तरी गरजूनी याचा लाभ घ्यावा असे डॉ.संजीव करंडे यांनी सांगितले,नवरात्र उत्सव निमित्ताने या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे परिसरातील गरजू रुग्णांना नक्कीच याचा फायदा होणार आहे

Previous articleपिंपळगाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रंगनाथ गुळवे
Next articleकै.तुकाराम धगाटे यांच्या स्मरणार्थ दौंडमध्ये मोफत भगवतगीता क्लास