खेडेकर मळा ते बायफ संस्थेचा रेल्वे मोरी खालचा रस्ता चालू करण्याची भाजपची मागणी

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन गावांमधील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चाललेली असून आपल्या उरुळी कांचन पुणे सोलापूर रेल्वे लाईन मुळे दोन भाग होतात. उत्तर व दक्षिण उरुळी कांचन मधून रेल्वेच्या उत्तरेकडील भाग की जो गावच्या एकूण क्षेत्रफळापैकी ६० टक्के आहे. लोकसंख्या ही उरुळी कांचन मधील पंचवीस ते तीस हजाराच्या आसपास आहे. उरुळी कांचन मधून भवरापुर, आष्टापूर, कोरेगावमुळ, टिळेकरवाडी- खामगावटेक व नदीपलीकडील गावातील वाहतुकी एकमेव मार्ग आहे. रेल्वे लाइन क्रॉस करण्यासाठी सध्या एकमेव पर्याय आहे पावसाळ्यात तर ओढ्याला येणाऱ्या पाण्यामुळे अधून मधून रस्ता हा पूर्णपणे बंद राहतो. खेडेकर मळा येथील रेल्वे पुलाखालील रस्ता हा वाहतुकीस खुला झाला तर टिळेकर वाडी बायफ संस्था तांबे वस्ती गोळे वस्ती खामगाव नदीकडील वाहतुक ही त्या मार्गी होऊ शकते व उरुळी कांचन मधील ट्रॅफिकचा प्रश्न मार्गी लागेल.

यासंदर्भात निवेदन देताना भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र व्यापार आघाडी अध्यक्ष विकास जगताप, पुणे जिल्हा भाजपा सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, मा.सदस्या ग्रामपंचायत सारिका लोणारी, उरुळी कांचन भाजपचे शहराध्यक्ष अमित कांचन, झोपडपट्टी सुरक्षादलाचे जिल्हा अध्यक्ष आबा चव्हाण, पुजा सणस, ऋषिकेश शेळके, ऋतिक तुपे, शुभम वलटे इत्यादी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleकै.तुकाराम धगाटे यांच्या स्मरणार्थ दौंडमध्ये मोफत भगवतगीता क्लास
Next articleडाॅ. आव्हाड दांपत्याचा “एक्सिलंस इन होलिस्टिक हेल्थकेअर “पुरस्काराने गौरव