डाॅ. आव्हाड दांपत्याचा “एक्सिलंस इन होलिस्टिक हेल्थकेअर “पुरस्काराने गौरव

सचिन आव्हाड

पुणे : पुण्यातील आरोग्यसेवा क्षेत्रातील योगदानासाठी काम करणाऱ्या “लोटस हेल्थकेअर क्लिनिक,पुणे” येथील प्रमुख डाॅ.गणेश आणि डॉ अर्चना आव्हाड दाम्पत्याला भारताच्या “केंद्रिय मंत्री श्री. फग्गन सिंह कुलस्ते – (पोलाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री भारत सरकार) व प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा (निर्माता आणि उद्योजक) यांच्या हस्ते “एक्सिलंस इन होलिस्टिक हेल्थकेअर ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्ली येथे आयोजित 29 सप्टेंबर 2021 रोजी “हॉटेल शांग्री -ला – इरोस हॉटेल” येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्यावेळी श्रीमती. जुही चावला, श्री. एस पी सिंह बघेल – (कायदा आणि न्याय राज्यमंत्री भारत सरकार) श्री चौधरी उदयभान सिंह (मंत्री:खादी आणि ग्रामोद्योग, रेशीम उद्योग, वस्त्रोद्योग), श्री. विनय चौधरी (दिल्ली भाजपचे प्रवक्ते), अंका वर्मा (मिस रोमानिया) ई. मान्यवर उपस्थित होते.

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील निवडक संस्थांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी “आयकॉनिक हेल्थकेअर समिट आणि अवॉर्ड्स द्वारे “हेल्थकेअर एक्सिलंस’ पुरस्कार दिल्या जातो. यंदाचे या पुरस्काराचे दहावे वर्ष आहे.

सध्याच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार , मधुमेह, स्थूलता, थाईरॉईड, लिव्हर, कर्करोग, वंध्यत्व, त्वचा, केसांच्या समस्या यासाठी सातत्याने संशोधन करण्याचे काम 16 वर्षांपासून डॉ. आव्हाड दाम्पत्य करीत आहे.
भारतातील आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

आतापर्यंत त्यांनी जगातील विविध देशांमधील हजारो डाॅक्टरांसमोर शोध निबंध सादर केले आहेत.

आतापर्यंतचा डॉ. आव्हाड यांचा युरोप, लंडन,सिंगापूर, बेल्जियम,जर्मनी,मलेशिया,इ. विविध देशांमध्ये मधुमेह, स्थौल्य,थायराॅइड विषयांवरचा संमेलनातील सहभाग महत्त्वपूर्ण राहिला आहे.

“लोटस हेल्थकेअर क्लिनिक,पुणे” येथे वैद्यकीय क्षेत्रातील विविध निष्णात डॉक्टरांचा चमू कार्यरत आहे. येथे कठीण आजारांचे योग्य निदान होऊन सर्वांगीण व व्यापक दृष्टिकोन ठेवून आधुनिक आयुर्वेदासह संयुक्त चिकित्सा केली जाते.

देशांतील तसेच अमेरिका, युरोप,आशिया मधील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वैद्यकीय संशोधन डॉ आव्हाड यांच्या लोटस हेल्थकेअर क्लिनिक मध्ये केले जाते.
त्याचप्रमाणे मागील दशकापासून डॉ आव्हाड हे ड्रग कंट्रोलर जनरल, भारत सरकार नोंदणीकृत नीतिमत्ता नियामक समिती वर देखील कार्यरत आहेत.

Previous articleखेडेकर मळा ते बायफ संस्थेचा रेल्वे मोरी खालचा रस्ता चालू करण्याची भाजपची मागणी
Next articleशाळांनी नवीन पिढीला वन्यजीवांच्या रक्षणासाठी सुसंस्कारित करावे- योगेश नाईकरे