यश मिळवायचे असेल तर सकारात्मक विचारांची गरज – जितेंद्र गुंजाळ

नारायणगांव (किरण वाजगे)

 कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सकारात्मक विचारांची गरज आहे. सकारात्मक विचारांच्या जोरावर कठिणातल्या कठिण गोष्टीलाही गवसणी घालता येते. जगाच्या पाठीवर अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी आपल्या कमतरतेवर सकारात्मक विचारांनी मात केली व आपले धेय्य साध्य केले. आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे हे विद्यार्थी सुध्दा त्यांच्या धेय्याजवळ पोहोचले आहेत. आता यापुढील उद्दिष्ठ निश्चित करून आपण प्राप्त केलेले ज्ञान व आपली सकारात्मक उर्जा यांची सांगड घालून आपआपल्या क्षेत्रातील उत्तुंग शिखरापर्यंत भरारी मारण्याचे बळ नक्कीच आजच्या या सोहळ्यातून विद्यार्थ्यांना मिळेल, असे मत जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी व्यक्त केले. जयहिंद शैक्षणिक संकुलामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती व जयहिंद कॉम्प्रेहेन्सिव्ह एज्युकेशनल इन्स्टिट्युटच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

या कार्यक्रमात विविध कंपण्यांमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या व परिक्षेमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल ३११ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये डॉ. राहुल मुळजकर यांनी लिहिलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स ऍन्ड टेलिकम्युनिकेशनचे डिजीटल सिग्नल प्रोसेसिंग या विषयाचवरील पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी संचालिका शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी.एस.गल्हे, जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल, जयहिंद पॉलिटेक्निकचे प्राचार्य योगेश गुंजाळ हे उपस्थित होत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. हेमंत महाजन व प्रा. रामदास गाडेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन डॉ. राहुल मुळजकर यांनी केले.

Previous articleनारायणगाव महाविद्यालयात गांधी जयंती व शास्त्री जयंती निमित्त व्याख्यान
Next articleकोरेगाव मुळमध्ये चोरट्यांनी केले २ लाख ५७ हजार रुपये लंपास