नारायणगाव महाविद्यालयात गांधी जयंती व शास्त्री जयंती निमित्त व्याख्यान

नारायणगाव ,किरण वाजगे

नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची ११७ वी जयंती साजरी करण्यात आली, तसेच भारत -पाकिस्तान मधील १९७१ चे युद्ध आणि त्यातून निर्माण झालेल्या बांगलादेशाच्या निर्मितीला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत, गेल्या ५ दशकापासून भारताने बांगलादेशाशी सामाजिक व सांस्कृतिक संबंध कायम ठेवले. त्या निमित्ताने यंदाचे वर्ष ‘स्वर्णीम विजय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत असून त्या निमित्ताने एनसीसी विभागातर्फे पोस्टर प्रदर्शन व मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.

 यात महात्मा गांधी यांनी सांगितले “स्वतः मध्ये तो बदल आणा, जो तुम्ही जगा मध्ये पाहू इच्छिता” अर्थात कोणत्याही बदलाची सुरवात स्वतः पासून करा असे गांधीजींचे विचार कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शिक्षण विस्तार अधिकारी अनिता शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

 तसेच भारत देशाचे द्वितीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, ज्यांनी ‘जय जवान, जय किसान’ चा नारा दिला त्यांच्या कार्याची ओळख करून दिली. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना आजच्या काळात शिक्षणाचे महत्त्व, बदललेल्या शिक्षण पद्धती त्याचा योग्य वापर करून आपण कसे पुढे जाऊ शकतो याबाबत तसेच स्पर्धा परीक्षांना न घाबरता कसे सामोरे जाता येईल याबाबत ही मार्गदर्शन केले.

  त्याच बरोबर आजच्या स्मार्ट फोन च्या काळात वर्तमान पत्र वाचून आपण कसे ज्ञान मिळवावे याचे मार्गदर्शन त्यांनी केले.

या वेळी मानसशास्त्र विभाग प्रमुख व एनसीसी विभाग प्रमुख डॉ कॅप्टन दिलीप शिवणे यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अनिता दिनेश शिंदे (शिक्षण विस्तार अधिकारी) यांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनियर अंडर ऑफिसर निशांत अवचट याने केले तर आभार ज्युनिअर अंडर ऑफिसर साईराज काळे याने मानले.

Previous articleगावठी पिस्तूलासह दोघे जेरबंद
Next articleयश मिळवायचे असेल तर सकारात्मक विचारांची गरज – जितेंद्र गुंजाळ