कोरेगाव मुळमध्ये चोरट्यांनी केले २ लाख ५७ हजार रुपये लंपास

अमोल भोसले,उरुळी कांचन

घरातील सर्वजण झोपले आहेत याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी तीन घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ५७ हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला असल्याची घटना कोरेगांवमुळ ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.

          याप्रकरणी वहातूक व्यावसायिक शुभम कोंडीबा बोधे (वय २३, रा. कोरेगांवमुळ , बोधे काकडे वस्ती, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार बोले हे स्वरा एंटरप्रायझेस नांवाने माल वाहतुकीचा व्यवसाय करतात. कामगारांचे वेतन करण्याचे असलेने ते रोख रक्कम बाळगुन असतात. कामावरुन आल्यावर त्यांनी रोख रक्कम २३ हजार रुपये बेडरुममधील कपाटात ठेवले होते.

            दिनांक १ ऑक्टोबर रोजी ते उशीराने घरी आले. त्यानंतर पत्नी पुजा समवेत जेवण खाण करुन रात्री १ वाजणेच्या सुमारास झोपी गेले. त्यानंतर पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांचे शेजारी राहणारे चुलते अतुल तवाजी बोधे, हे नेहमीप्रमाणे मार्केटयार्डकडे भाजीपाला आणणेकरीता टेम्पो घेऊन निघाले असता, त्यांना शुभम यांचे घराचा दरवाजा त्यांना उघडा असलेला दिसला. त्यामुळे त्यांनी शुभम यांना झोपेतुन उठविले, व दरवाजा का उघडा ठेवला आहेस. असे विचारलेमुळे त्यांना दिसले की, खोलीतील बेडरुममधील असलेले कपाटातील कपडे कोणीतरी उचकटुन त्यामधील चिजवस्तु लबाडीने चोरुन नेल्या आहेत. तसेच घराचा दरवाजा उघडया खिडकीवाटे काठी घालुन आतील कडी काढुन दरवाजावाटे आत प्रवेश करुन घरफोडी चोरी केली आहे. त्यामुळे त्यांनी पत्नी व आई समवेत पाहणी केली असता त्यांना कपाटात ठेवलेले १ लाख ५० हजार रुपये किमतीचे ५ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, २४ हजार रुपये किमतीच्या ८ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या लेडीज अंगठया, ४५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे नेकलेस, १२ हजार रुपये किमतीच्या एकुण ६ ग्रॅम वजनाच्या तीन नथी या सोन्याचे दागिन्यांसह २३ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ५४ हजार रुपयेचा ऐवज मिळून आला नाही.

             याचबरोबर बोधे – काकडे वस्तीतील राहणारे चंद्रकांत तुकाराम काकडे यांचे राहते घराचा कडीकोयंडा उचकटुन आत प्रवेश करुन त्यांचे रोख रुपये १ हजार ५०० रूपये तसेच सोनु लालुप्रसाद श्रीवास्तव याचे राहते घराचे खिडकीतुन आत हात घालुन त्याचे पॅन्टच्या खिशातील रोख रुपये

१ हजार ५०० रुपये चोरटयांनी चोरुन नेले आहेत. म्हणून बोधे यांनी ऊरूळी कांचन दूरक्षेत्रात एकुण २ लाख ५७ हजार रुपये किमतीचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरटयांनी घरफोडी चोरी करुन नेला असल्याची फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार हे करत आहेत.

Previous articleयश मिळवायचे असेल तर सकारात्मक विचारांची गरज – जितेंद्र गुंजाळ
Next articleमहसूल विभागाच्या वतीने विविध दाखल्यांचे खासदार डॉ.अमोल कोल्हें यांच्या हस्ते वाटप