भारतीय किसान संघाच्यावतीने पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर एक रक्कमी एफआरपीसाठी आंदोलन

गणेश सातव,वाघोली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उसाला साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी द्यावा यासाठी काल गुरुवार,दि.३० रोजी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावरं भारतीय किसान संघ,महाराष्ट्र प्रांताच्यावतीने आंदोलन करण्यात आले.यावेळ महाराष्ट्र भरातून शेतकरी, कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांना उसाला ४ हजार रुपये प्रतीटन बाजारभाव द्यावा या मागणीचे निवेदनही यावेळी देण्यात आले.

भारतीय किसान संघ हि एक अराजकीय संघटना असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटे प्रयत्न कुठलीही तडजोड करणार नाही व स्वस्थ बसणार नाही असे मत संघटनेचे नेते चंदनराव पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय नेते मान साया रेड्डी,अँड.माऊली तुपे,अँड.सुभाष देशमुख, रावसाहेब शहाणे,मदनराव देशपांडे, कपिला मुठे,उत्तमराव भोंडवे,नारायणराव खुळे संघटनेचे आदी पदाधिकारी व शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमाहिती सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या बरोबरच गावोगावी वृक्षसंवर्धन चळवळ राबवावी – चंद्रकांत वारघडे
Next articleवाघोलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश