वाघोलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

गणेश सातव, वाघोली

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वाघोलीत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नियोजित शिरुर नगरपरिषदेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन सोहळा पार पाडल्यानंतर पुणे परतीच्या प्रवासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाघोली येथे शिरुर हवेलीचे आमदार अँड.अशोक बापु पवार यांच्या कार्यालयास भेट दिली.यावेळी पार पडलेल्या छोटेखानी सोहळ्यात हा प्रवेश पार पडला.

वाघोली गावचे माजी उपसरपंच समीर भाडळे,विद्यमान उपसरपंच महेंद्र भाडळे,माजी ग्रामपंचायत सदस्य सदस्य सुधीर भाडळे, सदस्या वंदना दाभाडे,तंटामुक्ती समीती माजी अध्यक्ष प्रमोद भाडळे,वाघेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष चैतन्य सातव,युवा उद्योजक सागर जाधव,निखिल भाडळे,सुशिल जाधव,संतोष (जाॅन) तांबे,भारत सातव,दिलीप काळे,श्रीधर भाडळे,लखन भाडळे,दिपक बढे,विशाल शिंदे,सनी अंसारी,अजित सातव,रोहित शिंदे,प्रणय सातव,आसिफ शेख,ज्ञानेश्वर तांबे,मोसीम शेख,घनश्याम सातव,सचिन नवले,अतुल बनकर,प्रमोद (जाधव) भाडळे,युवराज भाडळे,प्रतिक तांबे,गफार शेख,स्वप्निल वराळे,सदानंद तुपे,ज्ञानेश्वर लबडे व इतरही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,वाघोली गावचे माजी सरपंच माणिकराव सातव पाटील,माजी जि.प.सदस्य रामदास दाभाडे,सरपंच वसुंधरा उबाळे,माजी उपसरपंच राजेंद्र सातव,माजी उपसरपंच कैलास सातव,आव्हळवाडीचे माजी उपसरपंच संदेश आव्हाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश शितोळे,ऋषीराज पवार माजी सरपंच शिवदास उबाळे, पुणे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब सातव (गवळी) वाडेबोल्हाईचे सरपंच दिपक गावडे,माजी उपसरपंच राजेश वारघडे, शिरसवडीचे सरपंच संतोष गावडे,उद्योजक सागर भाडळे, गणेश सातव,मंगेश सातव,व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleभारतीय किसान संघाच्यावतीने पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर एक रक्कमी एफआरपीसाठी आंदोलन
Next articleमानव आणि वन्यजीव समन्वयासाठी पर्यावरणाचा समतोल आवश्यक -प्रदिप रौंधळ वनपरिक्षेत्र अधिकारी