माहिती सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या बरोबरच गावोगावी वृक्षसंवर्धन चळवळ राबवावी – चंद्रकांत वारघडे

 

गणेश सातव, वाघोली

शुद्ध आचार,शुद्ध विचार, निष्कलंक चारित्र्य,जिवनात थोडा त्याग व अपमान पचवण्याची सहनशीलता ही पंचसूत्री कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे.प्रपंच सांभाळून दिवसातून एखादा तास, आठवड्यातून एखादा दिवस समाजासाठी दिला पाहिजे. कार्यकर्त्यांनी निस्वार्थी काम करावे असे आवाहन वढु खुर्द हद्दीतील चोंधे फार्म येथे पार पडलेल्या पुणे जिल्हा माहिती सेवा समिती कार्यकर्ता आढावा बैठकी दरम्यान माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी केले.

      माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वढू येथे पुणे जिल्हा कार्यकारिणी च्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी चंद्रकांत वारघडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.

    माहिती अधिकार कायद्याचा वापर कसा करावा, गाव तिथे कार्यकर्ता,प्रत्येक सरकारी कार्यालयातील चुकीच्या कामांना आळा बसण्यासाठी कसे नियोजन केले पाहिजे याविषयी उपयुक्त मार्गदर्शन यावेळी चंद्रकांत वारघडे यांनी केले.

महावितरणच्या प्रलंबित प्रश्नांबाबत माहिती अधिकार कायदा कसा वापरावा याबाबत चे सविस्तर मार्गदर्शन पुणे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश कोतवाल यांनी केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव प्रशांत भागवत,उपाध्यक्ष बाळासाहेब वारघडे,खेड तालुका अध्यक्ष प्रशांत वाडेकर,हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहिरट, शिरूर तालुका कार्याध्यक्ष शरद टेमगिरे,उपाध्यक्ष सुनील सात्रस, शिरूर तालुका वृक्ष संवर्धन समिती अध्यक्ष धर्मराज बोत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

  माहिती सेवा समितीचा कार्यकर्ता हा डोळ्यात पाणी येऊ देणारा नाही तर सरकारी अधिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. भविष्यात प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे माहिती सेवा समिती खंबीर पणे उभी राहणार असल्याचे आश्वासन यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांनी दिले.

  माहिती सेवा समिती पदाधिकारी आढावा बैठकी मध्ये पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी सागर खांदवे (लोहगाव), वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ अध्यक्ष पदी सागर इंगळे (वडगाव शेरी),दौंड तालुका अध्यक्ष पदी थोरात (वाळकी) , पुणे शहर संघटक पदी गणेश गवारे (पुणे), पुणे शहर शिक्षण समिती अध्यक्ष पदी मिश्रा (पुणे), कायदेविषयक सल्लागार पदी ॲड. कमल सावंत(पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली.पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केलेबद्दल सुनील भांडवलकर(दैनिक लोकमत),सचिन धुमाळ(दैनिक पोलीसनामा),शेरखान शेख (दैनिक प्रभात),सुरेश वांढेकर (दैनिक लोकमत),अमोल दरेकर(साप्ताहिक शिरूर हवेली),गणेश सातव,ज्ञानेश्वर पाटेकर (स्टार महाराष्ट्र न्युज),बंडू ब्राह्मणे (दैनिक प्रभात),गजानन गव्हाणे(दैनिक पुढारी) यांना उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरदराव पाबळे यांचा युवक व क्रिडा संचलनालयाच्या वतीने नेहरु युवा केंद्राचा पुरस्कार देऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वतीने नुकताचं

सन्मान करण्यात आले.या पार्श्वभूमीवर यावेळी शरदराव पाबळे यांचा माहिती सेवा समितीच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी मुळशी तालुका अध्यक्ष निखिल बोडके,मावळ तालुका अध्यक्ष गणेश सावळे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष शरद ढेरंगे,शिरूर तालुका उपाध्यक्ष शिर्के,विशाल वाडेकर,नागेश शिवले,शुभम शिवले,प्रकाश नागरवाड,गणेश जाधव यांच्या सह समिती चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष शिवले,पार्थ नानेकर यांनी तर आभार सचिव प्रशांत भागवत यांनी मानले.

Previous articleमाहिती सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या बरोबरच गावोगावी वृक्षसंवर्धन चळवळ राबवावी – चंद्रकांत वारघडे
Next articleभारतीय किसान संघाच्यावतीने पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर एक रक्कमी एफआरपीसाठी आंदोलन