कॅनॉल चाऱ्या दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची

 दिनेश पवार,दौंड

दौंड च्या पूर्व भागातील कॅनॉल चाऱ्यांची मागील काही वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे तरी या चाऱ्या त्वरित दुरुस्त कराव्यात अशी मागणी काळेवाडी येथील मा.ग्रा.सदस्य गणेश आबा गायकवाड व परिसरातील शेतकऱ्यांकडून दौंड चे आमदार राहुल कुल व खडकवासला पाटबंधारे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहेेेे.

पूर्व भागातील काळेवाडी, बोरिबेल, मलठण, देऊळगाव राजे,व परिसरातील कॅनॉलच्या चाऱ्यांची काही ठिकाणी मोडतोड झाली आहे तर काही ठिकाणी काटेरी झाडे उगवली आहे ते व्यवस्थित करून नादुरुस्त असणाऱ्या चाऱ्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दौंड च्या पूर्व भागातील कॅनॉल चाऱ्यांची दुरुस्ती झाल्यास होणारा पाण्याचा अपव्यय थांबून शेतकऱ्यांना मुबलक पाण्याचा लाभ होईल त्यामुळे ही दुरुस्ती त्वरित करावी-मा.ग्रा.सदस्य गणेश गायकवाड

Previous articleमोफत लसीकरण शिबिरास नागरिकांचा विक्रमी प्रतिसाद
Next articleग्राहकांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडले नाहीतर मनसे स्टाईलने आंदोलन करू – तानाजी तांबे