दावडीत शेतकऱ्यांची कार्यशाळा उत्साहात

राजगुरुनगर- जागतिक आनंदाची शाळा व दावडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांनो, उद्योजक व्हा’ ही कार्यशाळा दावडी (ता. खेड) येथे घेण्यात आली.यावेळी जागतिक आनंदाची शाळाचे संस्थापक विनय सातपुते यांनी मार्गदर्शन केले.

दावडीचे सरपंच संभाजी घारे, पोलिसपाटील आत्माराम डुंबरे तसेच सदस्य संतोष सातपुते यांनी लवकरच शेतकऱ्यांसाठी अद्ययावत कॉम्प्युटर लॅब उभी केली जाईल असे सांगितले.


जवळपास एक हजार कोटीचा भाजीपाला पिंपरी-चिंचवड परिसरात दर वर्षी लागतो. हाच माल स्वतः शेतकऱ्यांनी स्वतःच्या कंपनीमार्फत विकला तर सातत्याने पैसे मिळतील. या वेळी महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्राचे विभागीय अधिकारी सुरेश उमाप यांनी यशस्वी उद्योजक कसे होता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.

Previous articleकडूस क्रिकेट अकॅडमी व शिरूर स्पोर्ट क्लबची आगेकूच
Next articleकौतुकास्पद!भोसे गावचे उपसरपंच दिगंबर लोणारी यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून राबवला स्तुत्य उपक्रम