कौतुकास्पद!भोसे गावचे उपसरपंच दिगंबर लोणारी यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून राबवला स्तुत्य उपक्रम

चाकण – सामाजिक सेवेचा एकदा वसा घेतला की , तो आयुष्यभर चालू राहतो . समाजात वावरताना आपणही समाजाचे देणे लागतो ही भावना मनात असली की आपोआपच आपल्या हातून समाजसेवा घडते . असेच एक उदाहरण द्यावयाचे झाल्यास खेड तालुक्यातील भोसे गावचे उपसरपंच दिगंबर चंद्रकांत लोणारी यांचे द्यावे लागेल .

सद्यस्थितीत कोरोना महामारीचे भान ठेवून उपसरपंच दिगंबर लोणारी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून ग्रामीण भागात रुजलेली वाचक चळवळ आधी व्यापक व सक्षम व्हावी या दृष्टीने ग्रंथालय संचालक मंडळ व सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत नूतन प्रशस्त इमारत उभारण्याचा संकल्प केला असुन समाजोपयोगी स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक ग्रंथालयासाठी या ज्ञानमंदिराचे काम वेगाने सुरु आहे. त्यासाठी आपल्या यथाशक्तिने सढळ हाताने रोख रक्कम किंवा वस्तूरूपी देणगी देण्याचे अवाहन त्यांनी त्यांच्या सर्व हितचिंतकांना केले . या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून ५० हजार रुपये रोख रक्कम ग्रंथालयाच्या भव्य इमारती साठी जमा झाली.

वाढदिवसापेक्षा कोरोना विरुद्धच्या लढ्यात संवेदनशीलता महत्वाची आहे. हाच संदेश भोसे गावचे उपसरपंच दिगंबर लोणारी यांनी दिला.

सामाजिक बांधिलकीचे ,योगदानाचे भरभरून कौतुक भोसे पंचक्रोशित व खेड तालुक्यात केले जात आहे. या उपक्रमात भोसे गावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश दळवी , मुचकुंद जाधव , आण्णासाहेब लोणारी , विजय काळे , ज्ञानेश्वर मुंगसे , गणेश कुटे , हनुमंत कुटे , विश्वास गांडेकर , जालिंदर कुटे , सागर लोणारी यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले .कोरोना सारख्या अज्ञात शत्रूशी लढताना दिगंबर लोणारी यांच्या सारखे सामाजिक भान आज प्रत्येकाने ठेवले पाहिजे . हाच संदेश या स्तुप्त्य उपक्रमातून समाजामध्ये जात आहे .

Previous articleदावडीत शेतकऱ्यांची कार्यशाळा उत्साहात
Next articleराजगुरुनगरच्या गिर्यारोहकांनी मलंग गडावर फडकवला तिरंगा