पर्यावरण संवर्धन करणे सर्वांचीच जबाबदारी – पोलीस निरीक्षक विनोद घुगे

दिनेश पवार , दौंड- पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येत संवर्धन करणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे असे मत दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी व्यक्त केले. संस्कार स्कुल दौंडच्या वतीने आयोजित इकोफ्रेंडली गणेशोत्सव उपक्रमाचे व कोविड योद्धा सन्मान सोहळ्यात घुगे बोलत होते.

शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने निर्माल्य संकलन करणे,इकोफ्रेंडली गणपती उत्सव साजरा करणे,पर्यावरण संवर्धन जागृती करणे आशा उपक्रमात सहभाग घेतला होता त्याचा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.संस्कार स्कुलच्या वतीने निर्माल्य संकलन करून त्याचे खत तयार करून ते शाळेतील झाडांना घालणार असल्याचे अध्यक्ष जयंत पवार यांनी सांगितले.

 

 यावेळी पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे, क्रिडा संघटनेचे तालुकाध्यक्ष जालिंदर आवारी, पोलीस नाईक आण्णासाहेब देशमुख, अमीर शेख,संस्कार स्कुलचे संस्थापक अंबादास पवार,अध्यक्ष जयंत पवार उपस्थित होते.

 यावेळी पत्रकार सुमित सोनवणे, विनोद गायकवाड, पवन साळवे,वाजिद बागवान, विठ्ठल मोघे,सुशांत जगताप, दिनेश पवार, संतोष सोनवणे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा ओहळ यांनी केले तर आभार शमीम शेख यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

Previous articleशिर्डी सायकलवारीच्या तिकिटाचे छत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते अनावरण
Next articleसावरदरीत विक्रमी 1223 लोकांचे लसीकरण