शिर्डी सायकलवारीच्या तिकिटाचे छत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते अनावरण

नारायणगाव ,किरण वाजगे

भारत सरकारच्या भारतीय डाक विभागाच्या वतीने ५ ₹ च्या रेव्हीनिव्ह स्टॅम्पवर जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभुमी सायकलवारीचा लोगो प्रिंट करण्यात आला असून या तिकिटाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोल्हापुर गादीचे तेरावे वंशज,राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले.

शिवनेरी किल्यावरून दर वर्षी पर्यावरण व आरोग्य जनजागृतीसाठी “शिवजन्मभुमी फाउंडेशन” सायकलवारीचे आयोजन करण्यात येत असते.
या वर्षी या वारीचे पाचवे वर्षे आहे.त्या निमित्ताने हा कार्यक्रम नुकताच पुणे येथे घेण्यात आला.

यावेळी शिवजन्मभुमी सायकलवारीची टीमचे धनंजय माताडे,सुनिल इचके,संकेत वाघ,नितीन कांबळे, सायकलोपिडायचे शंकर गाढवे व शरद पोखरकर उपस्थित होते.

भारतात सर्वात पहिल्यांदाच हा सायकल प्रकारासाठी प्रिंट करण्यात आलेला लोगोचे ५ ₹ चे पोस्ट तिकीट तयार करण्यास मुंबई पोस्ट ऑफीस पुर्व विभागाचे डाक साह्यक महेश शिंदे यांनी विशेष सहकार्य केले.

शिवजन्मभुमी व सर्व सायकलप्रेमींसाठी हा एक मानाचा तुरा शिरपेचात लागला आसल्याचे संभाजीराजे म्हणाले.

यावर्षीची शिवनेरी ते शिर्डी आरोग्य जनजागृती
सायकलवारीचे २० नोव्हेबंर २०२१ रोजी आयोजन केले असून यात महाराष्ट्रभरातुन तसेच कर्नाटक,केरळ येथील २०० सायकलस्वार सहभागी होणार आसल्याचे साईसेवक धनंजय माताडे यांनी सांगितले.

Previous articleगोसासीत महालसीकरणाला उस्फूर्त प्रतिसाद
Next articleपर्यावरण संवर्धन करणे सर्वांचीच जबाबदारी – पोलीस निरीक्षक विनोद घुगे