सावरदरीत विक्रमी 1223 लोकांचे लसीकरण

चाकण -सावरदरी ग्रामपंचायत व करंजविहीरे आरोग्य केंद्र अंतर्गत सावरदरी येथे उच्चांकी कोविड लसीकरण करण्यात आले. यावेळी तब्बल १२२३ लोकांना कोव्हीशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला.

यावेळी गट विकास अधिकारी अजय जोशी यांनी देखील लसीकरण केंद्राला भेट दिली. केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ हरिदास टेकवडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मराडे सर व सहकारी आशा वर्कर्स सावरदरी गावचे सरपंच भरत तरस, मनसे चे तालुका अध्यक्ष, उपसरपंच संदिप बाळासाहेब पवार, ग्रामसेवक श्रीधर नाईकडे ,पोलिस पाटील राहुल साकोरे या वेळी लसीकरण केंद्रात गर्दी न करता लसीकरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केले होते.

यावेळी प्राध्यापक, संतोष शिंदे सर, मच्छिंद्र शेटे सर संदिप सस्ते सर युवा उद्योजक बाळासाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेटे, श्रीहरी सोनवणे, युवराज बोत्रे, बाळासाहेब बोत्रे ,सोमनाथ पवार विश्वास बुचूडे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन थोरात मिथुन शिंदे,संजय सोनवणे, मारूती मेंगळे ,काळुराम शेटे, दादु मेंगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते..

Previous articleपर्यावरण संवर्धन करणे सर्वांचीच जबाबदारी – पोलीस निरीक्षक विनोद घुगे
Next articleकडूस क्रिकेट अकॅडमी व शिरूर स्पोर्ट क्लब ची आगेकूच