गोसासीत महालसीकरणाला उस्फूर्त प्रतिसाद

राजगुरुनगर- खासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त महालसीकरण अभियान अंतर्गत गोसासी ठाकरवाडी मध्ये कोवीड 19 च्या कोव्हिशील्ड लसीचे लसीकरण घेण्यात आले.गावामध्ये बहुजन समाजाचे लसीकरण पूर्ण झाले असुन आदिवासी वाडी वस्तीवरील नागरिक भीतीने लसीकरणासाठी येत नाहीत. असाच अनुभव इतर गावांचा आहे परंतु गोसासी मध्ये अश्या वेळी त्या वाडी वस्तीवर जाऊन लसीकरण करायचे ठरविले आणि त्यानुसार हा लसीकरणाचा दुसरा टप्पा राबविण्यात आला व त्यामध्ये सर्व ग्रामपंचायतीच्या व इतर नागरिकांनी जनजागृती केली व 90% गोसासी येथील आदिवासी नागरिकांनी लस घेतली आहे.

यावेळी मदतीसाठी वाफगाव आरोग्य अधिकारी लिमजे, सिस्टर श्रीमती राधवन,आशावर्कर सारिका गोरडे, सर्व गोसासी शिक्षक वर्ग यांनी लसीकरणाचे काम पाहिले.

यावेळी सरपंच संतोष गोरडे, उपसरपंच धोंडीभाऊ शिंदे, सद्यस्य नारायण पुरी, एकनाथ गोरडे, गोरक्ष गोरडे, संदिप गोगावले, रवींद्र गोरडे, बाबासाहेब गोरडे ,संभाजी गोरडे आदींनी उपस्थित राहुन घरोघरी जाऊन नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

Previous articleराजगुरूनगरच्या गिर्यारोहकांचे भगतसिंग यांना मलंगगडाच्या बालेकिल्ल्यावर वंदन
Next articleशिर्डी सायकलवारीच्या तिकिटाचे छत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते अनावरण