रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पश्चिम महाराष्ट्राच्या युवक अध्यक्षपदी कैलास केदारी यांची नियुक्ती

राजगुरूनगर – येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक कैलास केदारी यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या पश्चिम महाराष्ट्राच्या युवक अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे युवक प्रदेशाध्यक्ष अमितभाऊ वर्मा यांनी नुकतेच केदारी यांना नियुक्तीचे पत्र दिले.

केदारी यांचे सामाजिक काम बघता पक्षाला त्यांचा भरभरून फायदा होऊ शकतो,असा विश्वास व्यक्त करत पुढील काळात केदारी यांनी पक्ष वाढीसाठी तनमनधनाने झटून काम करावे व शोषीत पिडीत तथा न्यायापासून दुर्लक्षितांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे असे आदेशही यावेळी देण्यात आले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या हा पक्ष विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतला मजबूत तथा सक्षम पर्याय असलेला पक्ष आहे.त्यामुळे बेरोजगारांच्या व महीला सक्षमीकरणाचेही काम आपल्या हातून घडावे अशा सदिच्छा ही वर्मा यांनी व्यक्त केल्या.

या प्रसंगी उपस्थित पदाधिका-यांनीही केदारी यांना सदिच्छा व्यक्त केल्या,यावेळी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून केदारी यांचे स्वागत होत आहे.

Previous articleदिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार- आमदार अॅड. राहुल कुल
Next articleजिल्हा परिषद व पंचायत समिती दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप