जिल्हा परिषद व पंचायत समिती दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

योगेश राऊत

भारत विकास परिषद योजनेअंतर्गत पंचायत समिती दौंड आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत विकास फूट कृत्रिम हाथ कृत्रिम पाय व कॅलिपर्स वाटपाचा कार्यक्रम 25-09-2021 रोजी यवत येथे आयोजित करण्यात आला.


दौंड तालुक्यातील व ग्रामीण भागातील दिव्यांग लोकांना भारत विकास परिषद योजनेचा लाभ दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात रहिवाशी असलेल्या दिव्यांग नागरिक बेरोजगार गोरगरीब शेतकरी यांना मिळवून देण्यात मा. उपसभापती सुशांत दरेकर यांनी महत्त्वाची भूमिका घेऊन 84 दिव्यांगांना कृत्रिम हाथ. कृत्रिम पाय आणि कॅलिपर्स यांचे मोफत वाटप करण्यात आले .

या प्रसंगी आमदार रमेश थोरात दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, भारत विकास परिषदचे अध्यक्ष मंदार जोग,विश्वास नायडू, नीलेश गोरे, गणेश कदम, दिलीप हंडाळ, नितीन दोरगे, दौंड पंचायत समितीच्या सभापती हेमलता फडके, सयाजी अण्णा ताकवणे,मीनाताई धायगुडे, झुंबर आप्पा गायकवाड, सदानंद दोरगे, कुंडलिक खुटवड, अमोल म्हेत्रे, ज्योती ताई झुरंगे, अभिजीत ताम्हणे, रोहन दोरगे सागर खुटवड, शुभ दोरगे. अमित कुदळे. राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व दिव्यांग बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पश्चिम महाराष्ट्राच्या युवक अध्यक्षपदी कैलास केदारी यांची नियुक्ती
Next articleआत्मा अंतर्गत हरितगृह व शेडनेट तंत्रज्ञ या विषयावरील कौशल्य आधारित प्रशिक्षणाचे आयोजन