कोविड योद्धांमुळेच समाजाचे मनोबल उंचावले- अतुल देशमुख

राजगुरुनगर -भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजगुरुनगर शहरात नगरपरिषद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला कोविड योद्धा सन्मान सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कोविड 19 किंवा कोरोना महामारीच्या काळात अनेक शासकीय व बिगरशासकीय नागरिकांनी व संस्थांनी व व्यक्तींनी कोविड सर्वेक्षण,प्रत्यक्ष रुग्णांची सेवा,अन्नदान,गरजूंना मदत,रहदारी नियंत्रण व बंदोबस्त,अशा विविध प्रकारे समाजसेवेचे अतुलनीय काम करीत समाजाचे मनोबल उंचावले होते.त्यांच्या या समग्र कार्याबाबत कृतज्ञता व आदर व्यक्त करणे हे आमचे कर्तव्यच आहे.असे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी कोविड योद्धा सन्मान प्रसंगी विविध व्यक्ती व संस्थांना सन्मानित करताना काढले.

राजगुरुनगर शहरातील सुमारे पंधरा विविध सामाजिक संस्थांना या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.

नगरसेवक मनोहर सांडभोर यांचाही वाढदिवस आज साजरा करण्यात आला.या प्रसंगी उपस्थित सत्कारार्थी संस्थाना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी असलेले कोविड योद्धा सन्मान टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले.

राजगुरुनगर शहर भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित या शानदार समारंभासाठी खेड तालुका भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष शांताराम भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी शहराध्यक्ष बाळासाहेब कहाणे,रोटरी क्लब अध्यक्ष अजित वाळुंज,बाळासाहेब वाडेकर,उद्योजक अमोल सांडभोर,मंगेश गुंडाळ,स्वानंद खेडकर,माणिक होरे,राहुल पिंगळे,सुशील मांजरे,पर्यावरण प्रेमी मुख्याध्यापक संजय नाईकरे खेड तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा मालनताई शिंदे, राजगुरुनगर भाजपा
शहराध्यक्षा दिप्तीताई कुलकर्णी, नगरसेविका संपदाताई सांडभोर, स्नेहलता गुंडाळ, रेखाताई श्रोत्रिय,रियाताई सांडभोर, संगिताताई जगताप आदी मान्यवर तसेच हुतात्मा राजगुरु स्मारक समिती,डाॅक्टर असोशिएशन,ग्रामीण रुग्णालय परिचारिका व रुग्णालय- चांडोली ,खेड पोलिस स्टेशन,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,चैतन्य संस्था,बजरंग दल, छत्रपती गणेशोत्सव मंडळ,एच पी गॅस वितरक,नगरपरिषद आरोग्य कर्मचारी महिला व पुरुष,
खेड तालुका व्यापारी महासंघ,रोटरी क्लब,आशा वर्कर,हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशन या संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleलहानपणापासूनच मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गोडी निर्माण करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य- निखिल कांचन
Next articleजिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी रक्तदात्यांसोबत केले रक्तदान