लहानपणापासूनच मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गोडी निर्माण करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य- निखिल कांचन

अमोल भोसले,उरुळी कांचन-येथील देवांश निलेश कांचन आणि द्रिव्या निलेश कांचन या ५ वर्षीय जुळ्या भाऊ बहिणीने आपल्या कुटुंबासमवेत हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगडाचा बालेकिल्ला यशस्वी सर केला. जुळ्या भाऊ बहिणीची अगदी कमी वयात राजगडाचा बालेकिल्ला सर करण्याची हि पहिलीच घटना राजगडाने अनुभवली. लहानपणापासूनच घरात छत्रपती शिवाजी महाराज आणि गड किल्ले यांचे बाळकडू आपल्या नातवंडांना देण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कांचन हे करत आले आहेत, याचीच पोचपावती म्हणजे किल्ले राजगडाचा बालेकिल्ला सर केल्याचा सुवर्णक्षण.

देवांश आणि द्रिव्या सोबतच त्यांचा आतेभाऊ राजवर्धन शिवाजी महाडिक (वय ८) याने सुद्धा हि कामगिरी केली. आपला महाराष्ट्राचा इतिहास अभेद्य ठेवायचा असेल तर लहानपणापासूनच मुलांमध्ये त्याची गोडी निर्माण करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे अशी भावना या चिमुरड्यांचे चुलते युवा नेते निखिल शिवाजी कांचन यांनी व्यक्त केली. या मोहीमेचे आयोजन निर्माण उद्योग समूहाचे संस्थापक संदीप नारायण कांचन यांनी केले होते.

Previous articleअखेर नारायणगावातील डॉ. अजय मते वर गुन्हा दाखल
Next articleकोविड योद्धांमुळेच समाजाचे मनोबल उंचावले- अतुल देशमुख