शिवशंभू छावा प्रतिष्ठाणचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

राजगुरूनगर- शिवशंभू छावा प्रतिष्ठानच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्या साधुन धर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळ ते प्रतिष्ठाणचे मुख्य कार्यालय श्रीक्षेञ निमगाव खंडोबा पर्यत ज्योतीचे व रॕलीचे नियोजन करण्यात आले.ठिकाणी ठिकाणी ज्योतीचे वाजंत्र्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.निमगाव खंडोबाचे येथील मुख्य कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाप्पुसाहेब थिटे ,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश सांडभोर ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संध्याताई शिंदे, जय मल्हार क्रांति संघटनेचे महा.राज्य युवक अध्यक्ष रोहीदास मदने ,जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे,अमर शिंदे यांनी आपले विचार मांडले तसेच कायदेशीर सल्लागार अॕड.राहुल तांबे यांनी विचार व्यक्त करताना प्रतिष्ठाणच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहुन गोरगरीब जनतेचे सर्व प्रकारे काम करण्याचे आश्वासन दिले .


या कार्यक्रमाला राहुल काकडे, दता टाकळकर,आदित्य कुंचाळे,सचिन राक्षे ,नवनाथ कुल्लाळ ,सचिन मैंड ,स्वप्नील पऱ्हाड ,बाळासाहेब शितकल , सरीता चव्हाण ,सुवर्णा शिंदे, संगिता गोरगल्ले ,प्रसाद मावळे ,संभाजी शिंदे,राहुलश भंडलकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोहर गोरगल्ले यांनी केले.

Previous articleउरळी कांचन येथे १८ आणि १९ डिसेंबरला मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन – एस.एम.देशमुख
Next articleअखेर नारायणगावातील डॉ. अजय मते वर गुन्हा दाखल