गुळाणीत आजीच्या स्मरणार्थ आरोग्य सेवकांचा सन्मान

राजगुरूनगर – श्री क्षेत्र गुळाणी (ता.खेड) येथे वयोवृद्ध आजी स्व.शांताबाई गोविंदराव पिंगळे यांच्या दशक्रियेमध्ये गावाची आरोग्यसेवा करणार्‍या आशा वर्कर आणि आरोग्य सेविकांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी निर्मलाताई पानसरे म्हणाल्या, “देव आणि देवमाणसांसाठी ऋणमुक्त नव्हे ऋणव्यक्त हा कृतज्ञभाव व्यक्त करणार्‍या पिंगळे परिवाराचा उपक्रम समाजासाठी आदर्शवत आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, माजी उपसभापती सतीश राक्षे, राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष गणेश थिगळे, अॅड.सुखदेवतात्या पानसरे, मयुर मोहिते, विजयसिंह शिंदे, बापुसाहेब थिटे, चंद्रकांत बधाले, बाबासाहेब गोरडे, दिलीप ढेरंगे, माऊली ढेरंगे, आशा तांबे, शिवराज्ञी पवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

दशक्रियांमध्ये देवस्थान, शाळांसाठी देणग्या देण्याची पद्धत रुढ झाली आहे. या परिवाराने देवस्थानांना देणग्या दिल्याच त्याचबरोबरीने कोरोना कालखंडात समाजाची मनोभावे सेवा केलेल्या आरोग्यदूतांना कृतज्ञ भावनेतून सन्मानित करण्यात आले.

आशा वर्कर सुनिता ढेरंगे, सारीका पिंगळे, आरोग्य सेविका आशा रोडे, मिनाक्षी पिंगळे, मनिषा सुर्वे, वैशाली गायकवाड, महिला बचत गट मार्गदर्शिका दिपाली कोरडे, दिपाली ढेरंगे, अंगणवाडी बालसेविका ताराबाई पिंगळे, मिना ढेरंगे, प्रवचनकार पोपटमहाराज राक्षे, पुजारी दामूजी गुरव यांना सन्मानचिन्ह, मानधन व शाल प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजन जालिंदर पिंगळे, सुर्यकांत सांडभोर, हनुमंत वेहळे, प्रविण जाधव, एकनाथ पिंगळे यांनी केले.सूत्रससंचालन धर्मराज पवळे यांनी केले तर आभार सुभाष पिंगळे यांनी मानले.

Previous articleबोरियेंदीयेथे कोरोना नियंत्रण कक्षाचे सरपंच गणेश दौंडकर यांच्या हस्ते उदघाटन
Next articleअवसरीत मांडूळाला जिवदान