अवसरीत मांडूळाला जिवदान

मंचर -आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील पुरोहित राम काका पराडकर यांच्या घराजवळ तीन फुटी मांडूळ आढळले होते. बिबट रेस्क्यू टीमचे सदस्य व सर्पमित्र किरण सदाशिव शिंदे यांनी मांडूळ शिताफीने पकडून वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या साहाय्याने निसर्ग सहवासात पूर्ण सोडून दिले

 अवसरी वळसे मळा मार्गे निरगुडसर या रस्त्यावर राम पराडकर हे राहतात काल रात्री नऊच्या सुमारास त्यांना घराजवळ साप असल्याचे आढळले त्यांनी तात्काळ बिबट रेस्क्यू टीमचे सदस्य व सर्प मित्र किरण शिंदे यांना फोन केला. त्यांनी घटनास्थळी तात्काळ जात पराडकर यांनी सांगितलेल्या जागेत साप शोधत असताना तो साप नसून मांडूळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले.हा मांडूळ पकडला नसता तर तो रस्त्यावर जाऊन एखाद्या वाहनाच्या खाली जाऊन त्याचा मृत्यू झाला असता असे शिंदे सांगितले.त्यांनी तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्याशी संपर्क केला असता वळती परिमंडळाचे वनपाल विजय वेलकर अवसरी वनरक्षक सी.एस. शिवचरण व बिबट रेस्क्यू टीम चे इतर सदस्यांच्या साह्याने मांडूळ जातीच्या सापाची अवसरी वन उद्यान येथे निसर्ग सहवासात सोडून दिले आहे.

Previous articleगुळाणीत आजीच्या स्मरणार्थ आरोग्य सेवकांचा सन्मान
Next article१८ आणि १९ डिसेंबर रोजी उरुळी कांचन येथे मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन : एस.एम.देशमुख