पीएमआरडीएच्या विकास आराखड्याच्या विरोधात पूर्व भागातील सेझ परिसरातील गावांचे आंदोलन

राजगुरूनगर- पीएमआरडीएच्या प्रस्तावित विकास आराखड्यास तीव्र विरोध करून सेझ परिसरातील रेटवडी , गोसाशी ,निमगाव ,दावडी, कनेरसर ,पूर ,वरुडे ,गाडकवाडी, वाफगाव, व इतर गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी तीव्र विरोध करून धामणटेक परिसरात खेड तालुक्याचे युवा नेते विजयसिंह शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर आंदोलन करण्यात आले.

सेझ परिसरातील MIDC मुळे औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात असताना आजूबाजूच्या गावांमध्ये वाढत्या नागरीकरणामुळे भविष्यात आवश्यक असणाऱ्या रहिवासी व कमर्शियल झोन ची आवश्यकता असताना PMRDA ने स्थानिक स्वराज्य संस्थां व नागरिकांना विश्वासात न घेता फक्त ग्रीन, ग्रीन -1व ग्रीन- 2 अशे झोन टाकल्यामुळे या गोष्टीला प्रखर विरोध केला आहे. वाढत्या नागरीकरणामुळे स्थानिकांना भविष्यात व्यवसाय करण्यास अडचण निर्माण होणार आहे ,त्यामुळे सेझ परिसरातील गावांचे झोन बदलण्यात यावी ,तसेच अनेक चुकीची आरक्षण टाकण्यात आलेले आहेत.ती बदलण्याची मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे.आंदोलनाचे प्रस्ताविक मारुतीशेठ गोरडे(उपाध्यक्ष: स्वाभिमानी शेतकरी संघटना खेड तालुका) यांनी केले.

शिवसेनेचे युवा नेते, समर्थ फाउंडेशनचे अँड विजयसिंह शिंदे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. अनेक सरपंचांनी यावेळी विचार मांडले .युवा नेते धनंजय बापू पठारे ,यावेळी गोसासीचे सरपंच संतोष गोरडे, युवा उद्योजक नवनाथशेठ घोलप, कनेरसरचे सरपंच सौ. सुनिताताई केदारी ,दावडीचे सरपंच संभाजीआबा घारे, निमगावचे उपसरपंच संतोष शिंदे ,पूरचे मा सरपंच संदीप गावडे, वरुडे चे उपसरपंच अण्णा चौधरी , गाडकवाडी चे सरपंच वैभव गावडे ,वाफगाव गावचे सरपंच उमेश रामाने, उपसरपंच नंदकुमार सुर्वे ,मा सरपंच बी टी शिंदे ,मा सरपंच बबनराव शिंदे, मा सरपंच दिलीप माशेरे, रेटवडी चे ग्रामपंचायत सदस्य दिलीप दुबे, संजय माशेरे, युवा उद्योजक देवा डांगे,बिरजू डांगे, चेअरमन भाऊसाहेब तांबे ,नवनाथ तांबे, युवराज तात्या शिंदे, संभाजी शिंदे, शंकर काळे, माणिक रेटवडे ,युवा नेते रुपेशआप्पा घारे, अनिल मामा नेटके, सोमनाथ घाडगे, नितीन गाडगे ,समाधान पानसरे, शरद काका थिटे , संतोष कराळे काळुराम वायकर ,विकास शिंदे, नितीन कराळे, युवा उद्योजक माऊलीशेठ गोरडे ,सागरदादा गोरडे(शिवसेना युवा पूर्व विभाग), युवा उद्योजक समीरदादा आरुडे ,तुकाराम भोंडवे, गणेश म्हसाडे, बबन म्हसाडे, युवा नेते महेश शिंदे उपस्थित होते.

Previous articleएक रक्तदान आपल्या जिवलगांसाठी – वाजगे आळी गणेशोत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम
Next articleविकासाला विरोध नाही मात्र प्रकल्पबाधितांचा विचार व्हावा’ खासदार डॉ. अमोल कोल्हे