एक रक्तदान आपल्या जिवलगांसाठी – वाजगे आळी गणेशोत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम

नारायणगाव, किरण वाजगे

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपल्या जवळची अनेक माणसे गतप्राण झाली. याच अनुषंगाने
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने नारायणगाव तालुका जुन्नर येथील श्री गणेशोत्सव मंडळ वाजगे आळी तसेच विक्रांत क्रीडा मंडळ, विक्रांत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोरोणा महामारीमुळे गतप्राण झालेल्या आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ सोमवार दि. १३ रोजी नारायणगाव येथील महावीर भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ४७७ जणांनी रक्तदान केले. यानिमित्ताने आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांनी २७ व्या वेळी, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक जंगम यांनी ३५ व्या वेळी तर कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी ३९ व्या वेळी रक्तदान केले.

या शिबिराला विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, भाजपच्या नेत्या व जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, नियोजन मंडळाचे सदस्य विकास दरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, युवा नेते अमित बेनके, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सरपंच राजेंद्र मेहेर, सरपंच योगेश पाटे, विघ्नहरचे संचालक संतोष नाना खैरे उपसरपंच माया डोंगरे, पुष्पाताई आहेर, उद्योजक संजय वारुळे, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, डॉ वर्षा गुंजाळ, अभय कोठारी अशोक गांधी, स्वप्निल भनसाळी, पप्पू चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते.


रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विक्रांत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष वाजगे, मुकेश वाजगे, सुरज वाजगे, हर्षल वाजगे, सुजित डोंगरे, नीलेश गोरडे, अनिकेत वाजगे, गणेश वाजगे, पप्पू सोलाट, करण परदेशी, अतुल वाजगे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Previous articleगौ रक्षा व युवा सबलीकरणासाठी युवकांनी प्रयत्न करावेत – डॉ.इंद्रेश कुमार
Next articleपीएमआरडीएच्या विकास आराखड्याच्या विरोधात पूर्व भागातील सेझ परिसरातील गावांचे आंदोलन