चाकणमध्ये नगरसेवकाकडे १५ लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल, पत्रकारासह एकाला अटक

चाकण- महिलेला विनयभंगाची खोटी तक्रार देण्यासाठी चाकण पोलीस ठाण्यात पाठवून प्रकरण मिटवण्यासाठी १५ लाखांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना चाकण(ता.खेड जि.पुणे) मध्ये उघडकीस आली आहे.एका नगरसेवकाने या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार चाकणचे माजी उपसरपंच, एक पत्रकार आणि मानवाधिकार संघटनेच्या काही महिला अशा एकूण ९ जणांवर सोमवारी (दि.१३ ) चाकण पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहिती वरून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर इतर आरोपी फरार आहे
सदरील घटना ४ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधी
दरम्यान आंबेठाण चौक येथील वैशाली कॉम्प्लेक्स मध्ये घडली असल्याचे पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.फिर्यादी किशोर शेवकरी यांनी त्यांच्या जवळील सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या चित्रफीत व व्हाट्स अप चॅटिंग पोलिसांकडे दिले आहेत

दिलेल्या फिर्यादीनुसार माजी उपसरपंच प्रीतम परदेशी, संगीता वानखेडे, कांतीलाल शिंदे, गीतांजली भस्मे, संगीता नाईकरे, मंदा जोगदंड, कुणाल राऊत, प्रणीत (पुर्ण नाव माहीत नाही ) आणि चाकणमधील पत्रकार कल्पेश भोई या ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यातील कुणाल राऊत आणि पत्रकार कल्पेश भोई यास सोमवारी रात्रीच्या वेळी पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.

या घटनेने चाकण शहरात एकाच खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड, उपनिरीक्षक विजय जगदाळे अधिक तपास करीत आहेत.

Previous articleदौंडमधील स्वातंत्र्यसैनिकांची ओळख ! स्वातंत्र्यसैनिक सदाशिव चांदोजी फडके
Next articleगौ रक्षा व युवा सबलीकरणासाठी युवकांनी प्रयत्न करावेत – डॉ.इंद्रेश कुमार