खेड घाटात दीडशे फूट खोल दरीत कार कोसळली

राजगुरूनगर- पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटातील बाह्यवळणा वर आज रात्री साडे बाराच्या सुमारास चारचाकी कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे .नाशिक कडून पुणे बाजूला जात असताना वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ही कार खेड घाटात सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळली आहे

मिळालेल्या माहितीनुसार,नाशिक कडून पुण्याच्या दिशेने जात असताना MH15FN1573 या वाहनाचा चालक संजय मधुकर खैरनार ( वय वर्षे 49 ) हे वाहन चालवत होते त्यांचा वाहनवरील ताबा सुटल्याने वाहन थेट नवीन खेड घाटातील वळणावर सुमारे दीडशे फूट खोल दरीत गेले. याबाबत खेड पोलिसांना माहिती मिळताच पोलिस अंमलदार स्वप्नील गाढवे, संतोष घोलप, भोईर, जाधव, अर्जुन गोडसे, होमगार्ड – लोखंडे, बाळा भांबुरे, हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन दरीतील अपघात ग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. जखमी वाहनचालकाला रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले मात्र या वाहनातून अजून किती जण प्रवास करत होते व अजून कोण जखमी झाले याची माहीती उशिरा पर्यंत मिळू शकली नाही.

Previous articleमहाविद्यालयाचे शुल्क कमी झाले शाळेचे कधी कमी होणार
Next articleदौंडमधील स्वातंत्र्यसैनिकांची ओळख ! स्वातंत्र्यसैनिक सदाशिव चांदोजी फडके