मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे काळाची गरज, त्यासाठी जी लागेल ती मदत करण्याची तयारी- निर्मलाताई पानसरे

राजगुरूनगर- शिरोली येथे मुलींसाठी आयोजित शौर्य प्रशिक्षण शिबाराच्या उदघाटन कार्यक्रमात बोलताना पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे काळाची गरज असल्याची भावना व्यक्त केली. अशा प्रशिक्षण शिबिराला जी आवश्यक असेल ती मदत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

या प्रशिक्षण वर्गात ५० मुलींनी सहभाग नोंदवला असून अद्याप नावनोंदणी सुरू असून श्री.विशाल आबा टाकळकर 87966 77467 यांच्याकडे ही नावनोंदणी सुरू आहे.

या शिबिरात मुली आणि महिलांनसाठी, स्वसंरक्षणासाठी लाठि-काठी, तलवार बाजी, भालाफेक आणि इतर अनेक युध्दकलाच्यां प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिबिराचे आयोजन बजरंग दल दुर्गावाहिनी, जाखमाता शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या शिबिराच्या उदघाटन पुणे जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा सौ. निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान संचालिका शिवसेना नेत्या सौ विजयाताई शिंदे , डॉ. सौ. निलमताई गायकवाड़ हुतात्मा राजगुरु फाऊंडेशन संचालिका , ॲड सुवर्णाताई ढोरे , शुभांगीताई शिंदे, सौ. उर्मिलाताई सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

महिलांना शौर्यप्रशिक्षण देणे हि काळाची किती गरज आहे हे मान्यवरांनी सांगितलेआणि हा उपक्रम तालुक्यातील प्रत्येक गावागावात जावा अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला शिरोली गावच्या उपसरपंच सौ.अलकाताई शिनकर, सौ जयाताई दजगुडे, सौ हिराताई वांळुज, सौ सोनालीताई सावंत, सौ उर्मिलाताई सावंत , सौ शुभांगीताई शिंदे तसेच प्रशिक्षक ह. भ. प अशोक महाराज पवार , ॲड निलेश आंधळे, जाखमाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तोपंत सावंत , माजी सरपंच चंद्रकांत सावंत, तंटामुक्तीचे अध्यक्ष दाजीभाऊ सावंत, माजी चेअरमन माऊली खरपासे, संजय राक्षे, सुधीर दजगुडे, सुरेश शिंदे आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरता बजरंग दलाचे कार्यकर्ते शेखर सावंत, विनोद लोहोट, मयुर लोहोट ,गणेश शिंदे आदिनी परिश्रम घेतले.

Previous articleमहिलांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन
Next articleरिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी आमदार भिमराव तापकीरांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन