रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी आमदार भिमराव तापकीरांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अतुल पवळे, पुणे

पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्थापित रिंग रोड मध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघातील बहुतांश गावांमधील जमीन ह्या रोडसाठी भूसंपादन केली जात आहे. ह्या भूसंपादनामुळे शेतकरी भूमिहीन होत आहे. ह्या प्रकल्पासाठी शेतजमीनबरोबरच, घरे, पोल्ट्री, बोअरवेल, फळबागा, विहीर, पानंद रस्ते, मंदिरे तसेच प्राण्यांच्या अधिवासावर देखील आक्रमण होत आहे. अशा भूसंपादनामुळे शेतकर्यांचा कोणत्याही विकास होताना प्रामुख्याने दिसत नाही. यासाठी दिला जाणारा मोबदला देखील अल्प प्रमाणात असल्याने शेतकर्यांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसानच आहे. या विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार भिमराव तापकीरांनी या बाधित शेतकर्यांच्या व्यथा समजून घेऊन त्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे मांडल्या आहेत.

धरण परिसरामुळे आधीच या भागात जमीन पाण्याखाली गेल्या असल्याने या भागातील शेतकरी आता अल्पभूधारक झाले आहेत. आता या प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन होत असल्याने या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून यांच्या समस्या सरकार दरबारी मांडणे हे माझे कर्तव्य आहे अशी प्रतिक्रिया आमदार भिमराव तापकीरांनी दिली. या रिंग रोड बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन शेतकर्यांना योग्य न्याय द्यावा ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

Previous articleमुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे काळाची गरज, त्यासाठी जी लागेल ती मदत करण्याची तयारी- निर्मलाताई पानसरे
Next articleमहाविद्यालयाचे शुल्क कमी झाले शाळेचे कधी कमी होणार