दौंड नगरपरिषदेकडून प्लास्टिक पिशवी आणि थर्मोकोल मुक्त रॅलीचे आयोजन

दिनेश पवार,दौंड

दौंड नगरपरिषदेकडून माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२२अंतर्गत प्लास्टिकचा वापर करू नका आणि कापडी पिशवी वापरा हा संदेश देण्यासाठी दौंड नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती प्रणोती मंगेश चलवादी यांच्या हस्ते कापडी पिशव्या भेट देऊन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकचे भांडे, चमचे , वाट्या तसेच इतर उत्पादने वापरू नये असा संदेश देण्यात आला.

या रॅलीची सुरुवात गांधी चौकामधून करून शहरातील शालीमार चौक, गोपाळवाडी रोड यामार्गे कापडी पिशवी वाटप करून कापडी पिशवी वापरा असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमदरम्यान चालताबोलता आणि प्रेमाने प्लास्टिकला पर्यायी आणि पर्यावरण पूरक गोष्टीचा वापर करून माझी वसुंधरा आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.

या प्रसंगी दौंड नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती प्रणोती चलवादी, आरोग्य निरीक्षक शाहू पाटील, मुकादम रवि जाधव, शुभम चौकटे,प्रवीण खुडे, नितीन तुपसौंदर्य, विनोद चितारे तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते

Previous articleशिरोलीमध्ये शौर्य प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन सोहळा सपंन्न
Next articleहाजी अबीद सय्यद यांनी तब्बल शंभर गरीब विद्यार्थ्यांची एक वर्षाची भरली शैक्षणिक फी