शिरोलीमध्ये शौर्य प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन सोहळा सपंन्न

राजगुरूनगर- शिरोली येथे बजरंग दल , आणि जाखमाता शिवजयंती उत्सव समिती यांच्या सयुंक्त विद्यमाने मुली आणि महिलांसाठी स्वसंरक्षणासाठी लाठी काठी , तलवार बाजी, भालाफेक आणि इतर अनेक युध्दकलाच्यां प्रशिक्षणाचे उद्घाटन पुणे जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान संचालिका शिवसेना नेत्या सौ विजयाताई शिंदे ,
डॉ सौ निलमताई गायकवाड़ हुतात्मा राजगुरु फाऊंडेशन संचालिका , ॲड सुवर्णाताई ढोरे , शुभांगीताई शिंदे, सौ उर्मिलाताई सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महिलांना शौर्यप्रशिक्षण देणे हि काळाची किती गरज आहे हे मान्यवरांनी सांगितले. आणि हा उपक्रम तालुक्यातील प्रत्येक गावागावात सुरु करावे असे सांगितले.

कार्यक्रमाला शिरोली गावच्या उपसरपंच सौ अलकाताई शिनकर, सौ जयाताई दजगुडे, सौ हिराताई वांळुज, सौ सोनालीताई सावंत, सौ उर्मिलाताई सावंत , सौ शुभांगीताई शिंदे.तसेच प्रशिक्षक ह. भ. प अशोक महाराज पवार , ॲड निलेश आंधळे, दत्ता भाऊ सावंत पीडीसी बँक, जाखमाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तोपंत सावंत , माजी सरपंच चंद्रकांत सावंत, तंटामुक्तीचे अध्यक्ष दाजीभाऊ सावंत, माजी चेअरमण माऊली खरपासे, संजय राक्षे, सुधीर बेढांले, सुरेश शिंदे आदि उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी होण्या करता बजरंग दलाचे कार्यकर्ते शेखर सावंत, विनोद लोहोट, मयुर लोहोट ,गणेश शिंदे, विशाल (आबा) टाकळकर आदिनी परिश्रम घेतले.

Previous articleराष्ट्रीय स्पर्धेसाठी मावळ तालुक्यातील ओझर्डे गावच्या सुपुत्रांची निवड
Next articleदौंड नगरपरिषदेकडून प्लास्टिक पिशवी आणि थर्मोकोल मुक्त रॅलीचे आयोजन