हाजी अबीद सय्यद यांनी तब्बल शंभर गरीब विद्यार्थ्यांची एक वर्षाची भरली शैक्षणिक फी

अतुल पवळे ,पुणे

सध्याची करोना ची परिस्थिती भक्ता व सर्वसामान्य जनतेवर आर्थिक संकट याची दखल घेऊन अबीद सय्यद यांनी समाजात एक चांगला उपक्रम राबवला.कोंढवा खुर्द येथील कौसरबाग वेलफेअर फाउंडेशनने गरजू गोरगरीब शंभर विद्यार्थ्यांना एक वर्षाची शैक्षणिक फी, कोरोनाकाळात काम करणारे डॉक्टर, कोविड मृतदेहाचे दफन करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला. कार्यक्रमाचे आयोजन हाजी अबीद सय्यद, हाजी तौसिफ शेख यांनी केले होते.

बकरी ईद काळामध्ये ऑनलाईन खरेदी-विक्री करून
त्यातून मिळालेला फायदा व आपल्या व्यवसायातील रोख रक्कम घालून जनसेवक अबीद सय्यद यांनी शंभर विद्यार्थ्यांना एक वर्षाची शैक्षणिक फी दिली. ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली त्यांनी खूप शिकावे व मोठे होऊन तुम्ही पुढील पिढीला स्कॉलरशिप कशी मिळवावी त्याची मार्गदर्शन करावे.उर्दू प्रायमरी हायस्कूलला धनादेश देताना डीसीपी नम्रता पाटील, चेतन तुपे-पाटील, प्रशांत जगताप, अबीद सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.पैसा, धनदौलत जवळ असूनदेखील आपण लॉकडाउन काळात बाहेर पडू शकलो नाही. कसे राहावे, कसे राहायला हवे हे कोरोनाने शिकविले असे मत झोन पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास आ. चेतन तुपे-पाटील, नगरसेवक प्रशांत
जगताप, डीसीपी नम्रता पाटील, माजी आमदार महादेव बाबर, नारायण लोणकर, नगरसेविका नंदा लोणकर, नगरसेवक अॅड. हाजी गफूरभाई पठाण, हाजी फिरोज शेख, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. गोरगरीब जनतेची सेवा करणे हेच एक उद्दिष्ट माझ्या जीवनात आहे असे मत जनसेवक अबीद सय्यद यांनी व्यक्त केले.

Previous articleदौंड नगरपरिषदेकडून प्लास्टिक पिशवी आणि थर्मोकोल मुक्त रॅलीचे आयोजन
Next articleमहिलांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन