राष्ट्रीय स्पर्धेसाठी मावळ तालुक्यातील ओझर्डे गावच्या सुपुत्रांची निवड

पवनानगर – मावळ तालुक्यातील ओझर्डे गावातील दया बाळासाहेब पारखी व किरण गरुड यांनी मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत आँलम्पिक टारगेट शूटिंग रेंजच्या मावळ तालुक्यातील ओझर्डे गावातील दया बाळासाहेब पारखी रायफल प्रकार मध्ये ६०० मीटर पैकी ५७३ गुणांसह वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर किरण गरुड यांनी ५६५ गुण दुसरा,शुभम तरस ५४५ गुण मिळवून तिसरा तर केतन राऊत यांनी ५४० गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला आहे.

या गुणासह पहिल्या क्रमांकाने पटकवलेल्या याची निवड अहमदाबाद गुजरात येथे होणाऱ्या आँल इंडिया जी – व्हि मालवणकर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यांना प्रशिक्षक स्नेहल पाटील, देवा दाभाडे,सरपंच बाळासाहेब पारखी,ममीता पाटील यांनी सहकार्य केले.

Previous articleगणेशोत्सव विशेष : श्री गणपती कडून जाणून घेऊ या ; सर्वोत्तम नेता होण्यासाठी लागणारे गुण- आशुतोष महाराज
Next articleशिरोलीमध्ये शौर्य प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन सोहळा सपंन्न