गणेशोत्सव विशेष : श्री गणपती कडून जाणून घेऊ या ; सर्वोत्तम नेता होण्यासाठी लागणारे गुण- आशुतोष महाराज

चाकण- आजचे नेते फक्त आणि फक्त आर्थिक प्रगतीला यशाचे मापदंड मानतात आणि या आर्थिक प्रगतीसाठी ते फक्त त्यांच्या मनाचे ऐकतात . प्रामाणिकपणे सांगायचे तर ,आजचे नेते इतके आपल्या बुद्धीचे ऐकतात की त्यांच्या हृदयातील आवाज फक्त दाबलेच गेले नाही तर ते चिरडलेत . म्हणजेच नेत्याचा ‘ आय . क्यू ( इंटेलिजेंस कोशेंट म्हणजे बुद्धिमत्ता ) ची पातळी वाढत आहे , परंतु ‘ ई . क्यू ( ईमोशनल कोशेंट म्हणजे भावनिकता ) पातळी कमी होत आहे . एका संशोधनानुसार , असे आढळून आले की जसजसा लोकांचा दर्जा वाढतो किंवा नेता जसजसा यशाची पायरी चढतो तसतसा त्याचा भावनिक स्तर कमी होतो.पण तुम्हाला माहीत आहे का गणाध्यक्षाचा गजमुख काय सूचित करतो ? हती हा अतिशय भावनिक प्राणी आहे . तो करुणा , सहकार्य , मैत्रीचे भाव खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो . कळपाच्या प्रत्येक सदस्याशी भावनिक बंधन सामायिक करतो . एवढेच नाही तर तो इतर सजीवांनाही सहकार्य करण्यास तयार असतो .पण त्याच्याकडे बुद्धिमतेचा अभाव आहे असे नाही . इतर प्राण्यांपेक्षा हत्तींमध्ये सर्वात जास्त ग्रे – मॅटर ( बुद्धी ) असते.तर या स्वरुपात , गणाध्यक्ष सर्व नेत्यांना हा संदेश देतात की.एका चांगल्या नेत्यामध्ये बुद्धी आणि भावना दोन्हीचा समतोल असावा

त्याने केवळ आर्थिक प्रगतीचे ध्येय ठेवून त्याच्या बुद्धीखाली निर्णय घेऊ नये , तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या स्थितीची आणि भावनांचीही काळजी घेऊन कंपनी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी विवेक आणि मनापासून घ्यावेत .गणाध्याक्षाचा चेहरा सांगणारी आणखी एक गोष्ट म्हणजे- ‘ नेत्याने भांडणात अडकू नये ‘ . तुम्हाला माहित आहे का की हत्तीचे डोके खूप नाजूक असते ? म्हणूनच हत्ती डोक्याने एकमेकांना स्पर्श करत नाहीत . तशाच प्रकारे , जर नेत्यांनी आपापसात संघर्ष ठेवला तर यश नक्कीच अपयशामध्ये बदलेल . त्यामुळे संघर्ष ,नैराश्य,भांडण यापासून नेहमी दूर राहा .

आता हत्तीच्या कानांच्या आकारापासून प्रेरणा घेऊ या . हतीचे कान खूप मोठे असतात . चांगल्या नेत्यालाही मोठे कान असले पाहिजेत . खरं तर , मोठे कान हे चांगले श्रोते होण्याचे प्रतीक आहेत . म्हणजेच , फक्त एक चांगला वक्ता असणे हे नेत्यासाठी पुरेसे नाही.जर त्याने आपले कर्मचारी , सहकारी यांची मते आणि विचार नीट ऐकली नाहीत तर नक्कीच तो यशस्वी नेता होऊ शकत नाही .
पण एक चांगला नेता तो आहे जो ऐकण्याची क्षमता आणखी वाढवतो . गजमुखांचे छोटे डोळे हे नेतृत्व कौशल्य शिकवतात की नेत्याचे लक्ष खोल आणि केंद्रित असावे.

युवा नेते स्वामी विवेकानंदांच्या या विधानामध्ये आजच्या नेत्यांनी टक लावून डोळा ठेवण्याची शिकवण स्पष्ट आहे – एक हेतू ( ध्येय ) घ्या . ते ध्येय तुमचे जीवन बनवा – त्याचा विचार करा , त्या ध्येयासह जगा . ते मिळवण्यासाठी तुमचा मेंदू , नसा , स्नायू , शरीराचा प्रत्येक भाग लावून द्या तरच तुम्हाला यश मिळू शकेल’.हत्तीचे छोटे डोळे हे कौशल्य सूत्र सांगतात . गणेशजी ला लांबोदर म्हणतात कारण त्यांचे उदर खूप मोठे आहे . नेत्याची पचनशक्ती चांगली असणे आवश्यक आहे याचे हे प्रतीक आहे . म्हणजे , जर कोणी तुम्हाला वाईट बोलले तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका . शहाणपणाने काम करा .

सरतेशेवटी असे म्हटले जाईल की एक चांगला नेता तो नव्हे जो पुढे येऊन आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश देतो . सर्वोत्तम नेते प्रत्येकाला मार्ग दाखवतात आणि त्यांना सांभाळण्यासाठी स्वतः त्यांच्या पाठीमागे उभी असतात .

दिव्य ज्योति जाग्रति संस्थेच्या वतीने गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा .

Previous articleरामनगर मधील म्हसोबा चौकातील तुंबलेला चेंबर स्वच्छ केल्याने ड्रेनेज लाईन सुरळीत
Next articleराष्ट्रीय स्पर्धेसाठी मावळ तालुक्यातील ओझर्डे गावच्या सुपुत्रांची निवड