लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नारायणगाव (किरण वाजगे)

आळेफाटा (ता.जुन्नर) पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबध ठेवत ८ लाख रूपये किमतीच्या दागिन्यांचा अपहार केल्या प्रकरणी आळेफाटा पोलीसांनी एका आरोपीस अटक केल्याची घटना शनिवार (दि.११ रोजी) घडली. या आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता, त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.अशी माहिती पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली.

याबाबत आळेफाटा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने तिच्या सोबत वेळोवेळी शारीरिक संबध ठेवून तसेच तिला विश्वासात घेऊन अडचणीचे कारण सांगून तिच्याकडून सुमारे ८ लाख रूपये किंमतीचे २० ते २१ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी विक्रम देवराम डोंगरे (वय २८, रा. पिंपळवंडी, ता.जुन्नर) या आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे. या आरोपीला आज जुन्नर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे व आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर करीत आहे.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निलम डोळसकर यांची निवड
Next articleमांजरीच्या सरपंचपदी स्वप्नील उंद्रे