मांजरीच्या सरपंचपदी स्वप्नील उंद्रे

अमोल भोसले,उरुळी कांचन

मांजरी खुर्द (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वप्नील दत्तात्रय उंद्रे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच महादेव रघुनाथ उंद्रे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदाच्या जागेसाठी एकमेव अर्ज स्वप्नील उंद्रे यांचा आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंदे यांनी स्वप्नील उंद्रे यांना सरपंच म्हणून जाहीर केले.

यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, शहर भाजप सरचिटणीस गणेश घोष, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, प्रविण काळभोर, जिल्हा भाजप सरचिटणीस सुदर्शन चौधरी, योध्दा गुप्रचे सुहास खुटवड, भाजपचे विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष अमोल शिवले, मा.उपसरपंच रवींद्र कंद, मा.सरपंच रवींद्र वाळके, विक्रम गायकवाड, रमेश मदने, सागर हरपले, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रमेश उंद्रे, उपसरपंच वर्षा उंद्रे, राघवेंद्र मानकर, करण मिसाळ, दिपक पवार, विकास उंद्रे, किशोर उंद्रे, प्रकाश सावंत, दिलीप उंद्रे, सिताराम उंद्रे आदी उपस्थित होते.

गावाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध आहे सर्वांना विश्वासात घेऊन विकासकामे करण्यासाठी प्रयत्न करणार असे नूतन सरपंच स्वप्नील उंद्रे यांनी सांगितले. भाजप पुणे शहर उपाध्यक्ष युवा मोर्चा म्हणून यापूर्वी काम करत होते.

Previous articleलग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Next articleतरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने सावकारावर गुन्हा दाखल