राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निलम डोळसकर यांची निवड

अतुल पवळे, पुणे

खडकवासला मतदारसंघातील वारजे माळवाडी भुसारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ब्लॉक अध्यक्षा व यशवंत एज्युकेशन सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका निलम डोळसकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

डोळसकर या़ंनी खडकवासला मतदारसंघ व वारजे परीसरात विविध विकासकामे त्यांनी शासकीय अधिकारी व नगरसेवकांकडून सतत पाठपुरावा करून पूर्ण करून घेतली आहे. विविध सन्मान योगी कार्यक्रमांचे आयोजन देखील त्यांनी केले आहे.

या निवडीमुळे सामान्य नागरिक व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वारजे विभागात विविध त्यांचे सत्कार देखील नागरिकांकडून करण्यात येत आहे.महिलांच्या विविध समस्यांसाठी त्या सोडविण्यासाठी नेहमी सक्रिय असतात.

निवडीसाठी त्यांनी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक सचिन दोडके, विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचे आभार मानले.

Previous articleउरुळी कांचन मध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त
Next articleलग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार