उरुळी कांचन मध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त

अमोल भोसले,उरुळी कांचन

गेल्या दोन वर्षापासुन कोरोना रोगाच्या संसर्गामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यावर बंदी आहे. गणेशोत्सव म्हटलं म्हणजे ढोल, ताशा, फटाके, कर्णकर्कश डी जे चा आवाज, विविध कलागुण प्रात्यक्षिके दाखवणारी पथके, झांज पथकांच्या संगीत तालिमी, कसरतीचे खेळ दाखवणारे युवक, गणपती बप्पा म्हटले की आपोआपच मुखातून येणारे शब्द मोरया एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार पण वाद्याविना गणेश उत्सव सलग दुसऱ्या वर्षी उरुळी कांचन शहरात साधेपणाने साजरा झाला असला तरी गणेश भक्तांचा उत्साह मात्र दांडगा होता.

या दरम्यान वाहतुकीचे कडेकोट नियोजन सदर बंदोबस्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सदाशिव गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र दिवेकर, पो.ह.भारती होले, पो.ना.संतोष अंदुरे, पो.आ.बाळासाहेब पांढरे, पो.ख.किशोर कुलकर्णी, पो.आ.संदीप धुमाळ तसेच गणपती आगमन होणारी वर्दळ प्रसंगी उत्तम प्रकारे बंदोबस्त केला.

Previous articleकाळूसमध्ये सिंजेंटा कंपनीतर्फे मधूमका (स्वीटकॉर्न) पीक चर्चासत्राचे आयोजन
Next articleराष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निलम डोळसकर यांची निवड