निधन वार्ता पाटस येथील आकुबाई आव्हाड यांचे अल्पशा आजाराने निधन

पाटस- येथील आकुबाई बबन आव्हाड(वय ७४) यांचे शनिवार (दि. ४ ) सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सून मुली नातवंडे असा परिवार आहे. अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभाव अशी त्यांची ओळख होती . त्यांच्या निधनाने आव्हाड कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .

मोठ्या कष्टाने आकुबाई आव्हाड यांनी कुटुंबाची प्रगती केली . कधीही कोणाला न दुखावता सर्वांना सोबत घेऊन त्यांनी आयुष्यात वाटचाल केली .

ईटिव्ही भारत चे दौंड प्रतिनिधी आणि दैनिक पुण्यनगरी चे पाटस येथील बातमीदार सचिन आव्हाड यांच्या त्या आजी होत्या .

दशक्रिया विधी : दशक्रिया विधी सोमवार दिनांक 13 रोजी सकाळी 9 वाजता पाटस येथील स्मशान भूमी येथे होणार आहे

Previous articleशिरोली येथे युवासेना शाखेचे उत्साहात उद्घाटन
Next articleआमदार भिमराव तापकीरांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत खडकवासला ते कोल्हेवाडी रस्त्याचे भूमिपूजन