शिरोली येथे युवासेना शाखेचे उत्साहात उद्घाटन

नारायणगाव (किरण वाजगे)

हरितालिकेच्या व श्री गणेश स्थापनेच्या शुभमुहूर्तावर शिरोली खुर्द (ता.जुन्नर) गावात युवा सेनेच्या शाखेचे उदघाटन शिरोली खुर्दचे सुपुत्र व धुळे नंदुरबार जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी युवासेना तालुका युवा अधिकारी विकी पारखे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.श्रीराम मंदिरासमोर झालेल्या या कार्यक्रमास गावातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

युवासेना शाखाप्रमुख म्हणून संकेत ढोमसे यांची नियुक्ती करण्यात आली.निलेश मोरे,सर्वेश ढोमसे, अविनाश सोमोशी यांची उपशाखाप्रमुख पदी स्वप्नील मोरे, सागर मोरे यांची सरचिटणीस पदी, कुणाल सोमोशी, ऋतिक मोरे यांची खजिनदार पदी,गणेश थोरात,गणेश सोमोशी, तेजस थोरात यांची प्रभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.धोंडिभाऊ मोरे, मंगेश सोमोशी, संतोष दामू मोरे यांची सल्लागार पदी निवड करण्यात आली.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना बबनराव थोरात म्हणाले की, शिवसेना हा गोरगरीबांचा पक्ष आहे या पक्षात सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला मोठे होण्याची संधी मिळते. शाखेच्या माध्यमातून अडीअडचणीच्या वेळी गावातील नागरिकांना मदत करावी,अन्याय झाला असेल तर गरीब माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना शाखाप्रमुख सुरेश ढोमसे यांनी केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पापडे, आशा सुनिल ढोमसे, माजी उपसरपंच रोहिदास थोरात, उमा ढोमसे, तसेच जालिंदर मोरे यांच्या जन्मदिवस असल्याने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व युवासैनिक उपस्थित होते.

Previous articleआरोग्य शिबिराचा हजारों नागरीकांनी घेतला लाभ
Next articleनिधन वार्ता पाटस येथील आकुबाई आव्हाड यांचे अल्पशा आजाराने निधन