आरोग्य शिबिराचा हजारों नागरीकांनी घेतला लाभ

काळुस – पंचक्रोशीतील हजारो लोकांना आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारा उपक्रम काळुस गावच्या ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य , वि का सोसायटी व शेतकरी संघटना,दिंडी मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काळुस व तज्ञ डाँक्टरांच्या योगदानातुन आयोजित केलेल्या शिबिराला नागरीकांनी घेतला

 

खेड तालुक्याचे नवनिर्वाचित सभापती  अरूणशेठ चौधरी यांचा काळुसच्या ग्रामस्थानी केला नागरी सत्कार प्रसंगी बाजार समितीचे सभापती विनायकशेठ घुमटकर आध्यक्षतेखाली व युवा नेते मयुर मोहिते पाटील यांच्या उपस्थितांमध्ये काळुस गावच्या सरपंच सौ धनश्री गणेशशेठ पवळे पाटील व उपसरपंच यशवंत खैरे , चेअरमन बारकुशेठ जाचक, चेअरमन योगेशशेठ पवळे पाटील व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक,शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, काळुसगावचे ग्रामस्थ तज्ञ डाँक्टरांच्या उपस्थित पार पडले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निवेदक नाथा पोटवडे यांनी केले तर प्रस्ताविक प्रा मोहनराव पवळे पाटील यांनी केले आभार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष पवळे पाटील यांनी केले.

शिबिरामध्ये डोळे तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अल्पदरात चस्मे एच .व्ही.देसाई नेत्र रुग्णालय हडपसर पुणे तसेच मधुमेह व रक्तदाब यासाठी डॉक्टर प्रशांत शेलार मधुमेह व रक्तदाब स्पेशलिस्ट यांनी काम पाहिले हृदय विकार किडनी फुपुसाचे विकार पोटाचे आजार व्हायरल इन्फेक्शन यासाठी मुक्ताई हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉक्टर दादासाहेब गारगोटे यांनी काम पाहिले स्त्री रोग तज्ञ ? वैद्यकीय अधीक्षक आळंदी देवाची डॉक्टर जाधव व डाँ पूनम जाधव स्त्री रोग तज्ञ यांनी काम पाहिले विशेष म्हणजे अपंग व दिव्यांग व्यक्तीसाठी अनेक योजनांची माहिती देऊन ऑनलाइन युनिक कार्ड फॉर्म भरून घेण्यात आले.शिबिर आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला उपक्रम मंडलिक काम पाहिले शिबिरात राबविल्या बद्दल नागरीकांनी विद्यमान सरपंच सौ धनश्री गणेशशेठ पवळे पाटील व ग्रामपंचायतचे यांच्या कार्यांस भरभरून प्रतिसाद देऊन कौतुक केले.

या प्रसंगी सभापती यांनी ग्रामपंचायत च्या कार्याचे कौतुक केले पदाधिकारी यांना धन्यवाद दिले.या प्रमाणे इतर गावाने असे उपक्रम राबवावे असे नमुद केले.डाँ दादासाहेब गारगोटे यांनी आरोग्याची काळजी कशी घेऊन उपचार त्वरीत घेऊन आरोग्य संपन्न जिवन जगण्याच मोलाचे मार्गदर्शन केले तसेच स्त्रीयांच्या आजारा विषयावर डाँ जाधव जी जी यांनी सविस्तर माहिती दिली.काळुस गावचे ग्रामदैवत श्री काळेश्वर मंदिर व परिसर विकास तसेच चालू असलेली देवस्थान समीती व युवा ऊद्योजक यांच्या योगदानाने चिंचेची झाडे लागवड तसेच संगमेश्वर मंदिर व परिसर विकास यांचे काम कौतुकास्पद आहे असे सभापती यांनी आपल्या भाषणात सांगितले.

काळुस गावचा विस्तार खुप मोठा असून विविध विकासकामे आमदार दिलीपराव मोहिते पाटील साहेब तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे यांच्या माध्यमातून मंजूर केले आहेत.काळुस गावच्या कारभारात काम करत असलेली तरूणांची गावच्या विकासाच्या दृष्टीने वाटचाल निश्चितच गावची विकासकामे करतील असे सभापती यांनी शिबिरातील सर्व डाँक्टरांना नागरीकांना भेटुन विचारपुस केली. शिबिर संध्याकाळी उशिरा पर्यंत चालू होते .नागरीकांनी शिबिराचा लाभ घेतला

Previous articleपुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा पारगे यांच्या माध्यमातून सिंहगड खोऱ्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी
Next articleशिरोली येथे युवासेना शाखेचे उत्साहात उद्घाटन