पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा पारगे यांच्या माध्यमातून सिंहगड खोऱ्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी

अतुल पवळे , खडकवासला

पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. पूजाताई पारगे यांच्या निधीतून संपूर्ण किल्ले सिंहगड खोऱ्यातून विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.याच अनुषंगाने आज खानापूर गावांत विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. सौ. पुजाताई पारगे व मा. जिल्हा परिषद सदस्य नवनाथदादा पारगे यांच्या शुभहस्ते झालेल्या भूमिपूजन समारंभातून या कामांचा श्रीगणेशा झाला असून, लवकरच ही कामे पूर्णत्वास जाणार असल्याचे अभिवचन यावेळी सौ पारगे यांनी दिले.

यावेळी सौ. पुजाताई पारगे, नवनाथ दादा पारगे यांच्यासह नारायणशेठ जावळकर ( मा. सरपंच खानापूर), संजय जावळकर (मा. पंचायत समिती सदस्य), मुरलीधर जावळकर (मा. उपसरपंच खानापूर), वैशाली बाळासाहेब जावळकर (मा.सरपंच), शांताबाई जावळकर (मा.उपसरपंच), लालाशेठ जावळकर (मा. सरपंच), सा. कार्यकर्ते माऊली जावळकर, केतन जावळकर, ग्रामसेवक सौ.वंदना गायकवाड, निकेतन दापटे (प्रशासक) व खानापूर ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleउत्तमनगर परिसरात अज्ञात चोरट्यांकडून घरफोडी
Next articleआरोग्य शिबिराचा हजारों नागरीकांनी घेतला लाभ