खेड पोलिस स्टेशनच्या वतीने तक्रार निवारण दिनाचे आयोजन

राजगुरुनगर :पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार गुरुवार ( दि 9) रोजी खेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधित अर्जदार गैर अर्जदार यांना समक्ष बोलावून त्यांच्या तक्रार अर्जातील तक्रारीवर त्वरित निर्णय घेऊन, पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.

तक्रारदार यांना मोबाईल फोनवरून फोन करून तसेच मेसेज करून माहिती देण्यात आलेली आहे. गुरुवार ( दि 9) रोजी सकाळी साडेदहा वाजता सिद्धेश्वर मंगल कार्यालयात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे

उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते व अन्य वरिष्ठ अधिकारी देखील भेट देणार आहेत. खेड पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी बीट अंमलदार व इतर कर्मचारी या तक्रार निवारण दिनास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तक्रारदारांच्या तक्रारीचे निराकरण त्याच दिवशी जागच्या जागी केले जाणार आहे .

जास्तीत जास्त तक्रारदार यांनी  उपस्थित राहून आपल्या तक्रारीचा निपटारा करून घ्यावा.असे आवाहन खेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी केले आहे.

Previous articleया वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा – सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते
Next articleनिधन वार्ता- सुमन मेहेर यांचे निधन