या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा – सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते

अमोल भोसले,उरुळी कांचन

आपल्या सणांचे महत्त्व प्रशासन समजू शकते या सणांवर बंधन घालायला प्रशासनाला आनंद नक्कीच होत नाही, मात्र कोरोना सारख्या महामारीने संपूर्ण जगाला सर्वांना हतबल केले आहे. त्यामुळे गणेश मूर्तींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवावेत व रात्री सुरक्षेसाठी मंडपात कार्यकर्ते ठेवावेत, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, गरजूंना मदत यासारखे उपक्रम राबवावेत, आपले मंडळ किंवा घर गणेशोत्सवातील गर्दी मुळे कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ नये. याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केले.

लोणी काळभोर (ता.हवेली) पोलीस ठाणे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ चे आयोजित बैठकीचे आयोजन कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथिल मंगल कार्यालयात करण्यात आली होती.

गणेशोत्सव हा आपला सर्वांचा आनंदाचा, श्रद्धेचा, भक्तीचा सण असून गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीही काळजी घेऊन , गर्दी न करता कोरोनाची तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून योग्य ती खबरदारी घेऊन या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा असे आवाहन हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी केले आहे.

यावेळी गुन्हे शाखेचे सुभाष काळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तमराव चक्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, दादाराजे पवार, श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, अमृता काटे, जयंत हंचाटे, हवेली रा.कॉ. तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, पंचायत समिती सदस्य सनी काळभोर, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, अनिल टिळेकर, तंटामुक्ती माजी जिल्हाध्यक्ष रघुनाथ चौधरी, लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर, उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन, सरपंच विठ्ठल शितोळे, उपसरपंच मनीषा कड, आळंदी महातोबाच्या सरपंच सोनाली जवळकर, रंगनाथ काळओर, माजी सरपंच नंदू काळभोर, सोरतापवाडीचे उपसरपंच निलेश खटाटे, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन, सरपंच सुरज चौधरी, सरपंच गणेश चौधरी, विविध गावचे पोलीस पाटील वर्षा कड, दत्तात्रय चौधरी, विजय टिळेकर, मिलिंद कुंजीर, चंद्रकांत टिळेकर ,मोहन कुंजीर व सार्वजनिक मंडळाचे सदस्य आदी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Previous articleशिक्षक दिनाच्या निमित्ताने माजी आदर्श पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे यांना गुरुदत्त सेवा मंडळाच्या वतीने सन्मानित
Next articleखेड पोलिस स्टेशनच्या वतीने तक्रार निवारण दिनाचे आयोजन