चंद्रकांत वारघडे यांचा वृक्षमित्र पुरस्काराने गौरव

अमोल भोसले,वाघोली

शौर्य पिठ तुळापुर येथे श्री शंभू साम्राज्य सेना या संस्थेच्या वतीने अध्यक्ष शेखर पाटील यांच्या माध्यमातून पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते चंद्रकांत वारघडे यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी आमदार निलेशजी लंके (नगर-पारनेर), पद्मश्री पोपटराव पवार आदर्श सरपंच हिवरे बाजार, योगेश केदार सल्लागार सदस्य- भारतीय अन्न महामंडळ, महाराष्ट्र, भारत सरकार, जिल्हा परिषद सदस्या अनुराधाताई नागवडे, श्री शंभुराज्याभिषेक सोहळा सदस्य सचिन सातपुते,
पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटना अध्यक्ष संदिप भोंडवे, सरपंच लवळे निलेशभाऊ गावडे, सरपंच दिपक गावडे, माजी उपसरपंच सचिन जाधव, उपसरपंच नवनाथशेठ शिवले, श्री शंभुराज्याभिषेक सोहळा सदस्य स्वप्नील काळे, श्री शंभुराज्याभिषेक सोहळा सदस्य नकुल भोईर, कमलेश बहीरट धनराज वारघडे हे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष शेखर पाटील, मा.सरपंच संतोष शिवले व त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल आमदार निलेश लंके यांनी कौतुक केले.

चंद्रकांत वारघडे यांचे वृक्षरोपणाचे काम उल्लेखनीय असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी श्री शंभुसाम्राज्य सेना १ ला वर्धापन दिनानिमित्त शौर्यपीठ तुळापूर येथे ते बोलत होते. छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करुन. वृक्षरोपण, रक्तदान शिबिर, व गरीब कुटुंबातील एक विवाह सोहळा संपन्न झाला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांंना विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन पोपटराव पवार यांचे हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

याचप्रमाणे अमृता पठारे यांना कोविड योध्दा , नवनाथ शिवले , पोलिस हवालदार ऋषीकेश व्यव्हारे , पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे , पत्रकार दिपक नायक यांनाही विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

तुळापूर गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रर्माचे सूत्रसंचालन संतोष शिवले, ओंकार वाळुंज, श्रावणी रत्नपारखी यांनी केले. ह्या सोहळ्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीमूळे सोहळा संपन्न झाला.

Previous articleखरपुडीच्या पंडीत गाडे यांच्या धाडसाचा धर्मराज पवळे यांनी केला सन्मान
Next articleअजिंक्य टेकवडे यांना कोवीड योद्धा पुरस्कार