अजिंक्य टेकवडे यांना कोवीड योद्धा पुरस्कार

अमोल भोसले,उरुळी कांचन

चैतन्य बहुउद्देशीय कृषी संस्था (महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्यावतीने समाजासाठी निसपृ:हपणे अवरीत काम करणार्‍या पुरंदरच्या भूमीपुत्रांचा पुरस्कार वितरण सोहळा सासवड येथे संपन्न झाला.

यावेळी कोवीड-१९ चा महामारित पुरंदर तालुक्यातील ५५ हुन अधिक गावांमधे अन्न धान्य कीट ८,५०० कुटुंबीयान पर्यंत वितरण केल्याबद्दल जावळार्जुन ग्रामपंचायत सदस्य आणि युवानेते अजिंक्य टेकवडे यांचा कोवीड योद्धा म्हणुन सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे तसेच प्रमुख पाहुणे निवृत्ति सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, सरपंच चांबळी प्रतिभाताई कदम व चैतन्य बहुउद्देशीय कृषी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पदाधिकारी, इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous articleचंद्रकांत वारघडे यांचा वृक्षमित्र पुरस्काराने गौरव
Next articleचंद्रकांत वारघडे यांचा वृक्षमित्र पुरस्काराने गौरव