दौंडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड

दिनेश पवार, दौंड : भरलेल्या घरगुती गॅस च्या टाकीतून मशीन च्या साह्याने रिकाम्या टाकीत गॅस काढून त्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला दौंड पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यादववस्ती दौंड येथे गॅस चा काळाबाजार होत असल्याची गुप्त बतमीद्वारे माहिती दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी,सहाय्य पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड,सहाय्यक फौजदार डी. जी.भाकरे,पोलीस हवालदार पांडुरंग थोरात,पोलीस कॉन्स्टेबल रवी काळे,एच.आर.भोंगळे,यांनी सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता तिथे पाच इसम भरलेल्या टाकीतील गॅस यंत्राच्या साह्याने रिकाम्या टाकीत भरत असल्याचे दिसून आले.

या प्रकरणाची माहिती पोलिसांनी तहसीलदार कार्यालयातील पुरवठा अधिकारी विजय भांडोरे यांना कळवून मुद्देमाल तपासकामी दौंड पोलीस स्टेशन ला आणण्यात आला,याप्रकरणी पोलिसांनी दोन गॅस पुरवठा करणारी वाहने आणि पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग राहुल धस,पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.

Previous articleफ्लेक्स होर्डिंगला अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची बेकायदेशीर रित्या वृक्षतोड
Next articleआखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्था पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रा.सुरेश वाळेकर यांची निवड