फ्लेक्स होर्डिंगला अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची बेकायदेशीर रित्या वृक्षतोड

गणेश सातव, वाघोली

वाघोली येथे चोखीढाणी रस्त्यालगतं उभारलेल्या फ्लेक्स होर्डिंग्जचे येणाऱ्या-जाणाऱ्यांना लांबून दर्शन व्हावे यासाठी फ्लेक्स उभा करणाऱ्या संबंधितांनी रस्त्यालगत असणाऱ्या काही वृक्षांची बेकायदेशीररित्या तोड केली आहे.

वाघोली परिसरात पुणे-नगर महामार्गालगत व अंतर्गत रस्त्यालगतही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फ्लेक्स उभे केलेले पहायला मिळतात.त्यावर प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही.काही फ्लेक्स उभे करणारे आपल्या फ्लेक्सला अडथळा येऊ नये,फ्लेकस् वरील जाहिरात व्यवस्थित येणाऱ्या-जाणाऱ्यांना दिसावी म्हणून रस्त्यालगतच्या वृक्षांचीही बेकायदेशीर तोड करत असतात.अश्यांवर वनविभाग व पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई केली पाहिजे.
अशी मागणी वृक्षसंवर्धन व माहिती अधिकार क्षेत्रात काम करणारे माहिती सेवा समिती संस्थापक चंद्रकांत वारघडे,वाघोली परिसरातील सामाजिक संस्था व वृक्षप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

Previous articleमंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणारे व शेतकऱ्यांच्या मोटारी चोरणारे अट्टल चोरटे जेरबंद
Next articleदौंडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड