आखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्था पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रा.सुरेश वाळेकर यांची निवड

अमोल भोसले,कोरेगावमुळ

आखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या पुणे जिल्हा शाखेच्या कार्याध्यक्षपदी प्रा.सुरेश वाळेकर कोरेगावमुळ (ता.हवेली) यांची पुणे जिल्हाध्यक्ष नथुजी कुंभार यांच्या शुभहस्ते नियुक्ती पञ देण्यात आले.

याप्रसंगी कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन जगदाळे, शामशेठ राजे महा.राज्य प्रदेश अध्यक्ष, किसन काळे महा राज्य युवक उपाध्यक्ष, जालिंदर घोटावडे पुणे शहर अध्यक्ष, ह.भ.प. वसंतरावजी सोमवंशी महाराज, संतोष पाषाणकर महा.राज्य कार्याध्यक्ष, किरण कुंभार पुणे जिल्हा खजिनदार आदी मान्यवर उपस्थित होते.

यापुढे पुणे जिल्हा कुंभार समाजाचे हिताचे व सामाजिक प्रश्न यांना योग्य पध्दतीने न्याय देण्याचे कार्य प्रामाणिकपणे करण्याचे आश्वासन प्रा.सुरेश वाळेकर यांनी पञ स्विकारताना दिले.

Previous articleदौंडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड
Next articleमुळशीत ई पीक पाहणीला प्रारंभ