कृष्णागी खांडेभराड हिच्या वाढदिवसानिमित्त रामभाऊ म्हाळगी विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप

राजगुरूनगर- रामभाऊ म्हाळगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कडूस येथे मुलगी कृष्णागी हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी हुतात्मा राजगुरू यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

रामभाऊ म्हाळगी विद्यालयाच्या वतीने कृष्णांगी हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक, संजीवनी विकास मंचचे अध्यक्ष दत्ताशेठ खांडेभराड, सचिव सुनिल कड ,पर्यवेक्षक अविनाश काळोखे, अनिल पोटे , आजिनाथ केदार ,विष्णुपंत पाटील , बबन डांगले उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रामदास रेटवडे व शिक्षक प्रविण काळे यांनी केले .

Previous articleजनआशिर्वाद यात्रा कशासाठी… पेट्रोल – डिझेलच्या व गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की, महाराष्ट्रात व देशात महागाई वाढवली म्हणून – जलसंपदा मंत्री जयंत पाटील
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यामुळे नारायणगावात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध